जामखेडची ज्ञानेश्वरी धनवे खेलो इंडिया ट्रायबल गेम्समध्ये तिहेरी पदक विजेती

जामखेडची ज्ञानेश्वरी धनवे खेलो इंडिया ट्रायबल गेम्समध्ये तिहेरी पदक विजेती
जामखेड प्रतिनिधी– छत्तीसगड राज्यातील अंबिकानगर येथे दि. २ एप्रिल ते ४ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत जामखेडच्या श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या कु. ज्ञानेश्वरी नितीन धनवे हिने उल्लेखनीय कामगिरी करत दोन रौप्य व एक कांस्य अशी एकूण तीन पदके पटकावली.
ज्ञानेश्वरीने विविध प्रकारांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले असून, तिच्या या यशामुळे जामखेडसह तिच्या मूळ गाव मातकुळीचे नावही राज्यस्तरावर उजळले आहे. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित असल्याचे तज्ञांचे मत आहे.
श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक संतोष (बबलु वस्ताद) टेकाळे, प्रशिक्षक अमोल निमोणकर, तसेच अहिल्यानगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे पदाधिकारी आणि तांत्रिक समिती सदस्य यांनी ज्ञानेश्वरीच्या मार्गदर्शनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
ज्ञानेश्वरीच्या या यशाबद्दल श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या सर्व सदस्यांनी, तसेच श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय, मातकुळी (ता. आष्टी) येथील पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी वर्गाने अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र संघाच्या विजयात तांत्रिक समिती सदस्य निलेश कुलकर्णी यांचे सहकार्यही निर्णायक ठरले असून, अहिल्यानगर जिल्ह्याचा मल्लखांब क्षेत्रातील दबदबा पुन्हा एकदा झाला आहे.



