बीड

सौ. के. एस.के.  महाविद्यालयात क्रांतीकारक संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

सौ. के. एस.के.  महाविद्यालयात क्रांतीकारक संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

बीड (प्रतिनीधी) : थोर समाजसुधारक, बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि ‘सामकी माता’ यांचे सुपुत्र क्रांतीकारक संत सेवालाल महाराज यांची 287 वी जयंती सौ के एस के महाविद्यालयात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवानंद क्षीरसागर यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर म्हणाले की, सेवालाल महाराजांनी ‘रक्षण करा, दया करा’ हा संदेश दिला. व्यसनमुक्ती, निसर्ग संवर्धन आणि सत्य पालनाचा त्यांनी आग्रह धरला. बंजारा संस्कृतीची जपणूक करतानाच त्यांनी समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचे महान कार्य केले. विद्यार्थ्यांनीही संत सेवालाल महाराजांच्या शिकवणीवर आधारित आपली मनोगते व्यक्त केली. ‘नगा रा नगा, सेवा बापू रा नगा’ या जयघोषाने महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशीद मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सरपते दयानंद यांनी मानले.

Back to top button