हस्ताक्षर लेखन स्पर्धेत:पांढरेवाडी शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी ध्रुवी उदमले जिल्ह्यात प्रथम

हस्ताक्षर लेखन स्पर्धेत:पांढरेवाडी शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी ध्रुवी उदमले जिल्ह्यात प्रथम
जामखेड प्रतिनिधी: दिनांक : ३१ जानेवारी २०२६ रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत हस्ताक्षर (लेखन) या प्रकारात किलबिल गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरेवाडी, ता.जामखेड शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी ध्रुवी धिरज उदमले हिने अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.तिच्या या यशात श्रीमती तेजस्विनी मासाळकर मॅडम, श्री.संतोष घोलप सर,श्री.प्रमोद जोशी सर, श्री.ज्ञानेश्वर सपकाळ सर, श्री रूपेश वाणी सर यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले.ध्रुवीचे आई व वडील दोघेही शिक्षक असून वडील श्री.धिरज अशोकराव उदमले हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरडवाडी, ता.जामखेड येथे कार्यरत आहेत व आई सौ. भामिनी धीरज उदमले ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदाळेवस्ती, ता.जामखेड येथे कार्यरत आहेत.यावेळी जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.प्रदीप चव्हाण साहेब, खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.अशोक आंधळे, केंद्रप्रमुख श्री.केशव गायकवाड, भाजपा शहर मंडलअध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद, उद्योगपती उमेश माळवदकर, नितीन शास्त्रकार यांनी ध्रुवीचे अभिनंदन केले.ध्रुवीने संपादन केलेल्या यशाबद्दल पंचक्रोशीतून,तालुक्यातून तसेच समस्त जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



