अजितदादांच्या अकाली निधनाने बीड सह महाराष्ट्रावर शोककळा..
*शिवसेना माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते सर*
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. धडाडीचे नेतृत्व, स्पष्ट भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले व सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. त्यांच्या जाण्याने राज्याने एक कर्तबगार, अनुभवी व लोकाभिमुख नेता गमावला आहे. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली…