📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

जनविकास सेवाभावी संस्थेच्या हळदी-कुंकू समारंभास महिला भगिनींची मोठी गर्दी

जनविकास सेवाभावी संस्थेच्या हळदी-कुंकू समारंभास महिला भगिनींची मोठी गर्दी

महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेणार – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

जामखेड प्रतिनिधी: जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार व प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक हर्षद काळे यांच्या वतीने शनिवार, दि.२४ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या निवासस्थानी कुंभारतळे जामखेड येथे तिळगुळ व हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.मकरसंक्रांत निमित्त आयोजित कार्यक्रमाला लाडक्या बहिणींची मोठी गर्दी दिसून आली. त्यानिमित्ताने वाण देऊन महिला भगिनींना सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की, हळदी-कुंकू कार्यक्रम हा केवळ एक समारंभ नसून भारतीय संस्कृती जपण्याचे प्रभावी माध्यम आहे. अशा कार्यक्रमांमधून महिलांना समतेने वागवण्याची भावना वृद्धिंगत होते तसेच महिलांचा सन्मान व गुणगौरव केला जातो.जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून असे उपक्रम राबविण्यात येत असून कौतुकास्पद आहे.येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहून प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमासाठी खर्डा गावच्या सरपंच संजीवनी पाटील, संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार, नगरसेवक हर्षद काळे, युवा नेते राम पवार,ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमा जाधव,महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशिद, दिपाली गर्जे,मिरा तंठक,जयश्री हतळगे,भाजपा महिला शहराध्यक्ष वैशाली शिंदे,सविता बारगजे,निशा पवार, प्रियंका काळे,रुक्साना पठाण, संगिता राऊत,विजयालक्ष्मी जाधव, प्रतिभा बोरा,साधना जाधव,शोभा नागरगोजे, रुक्मिणी शिंदे तसेच समाजातील अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.

Back to top button