जनविकास सेवाभावी संस्थेतर्फे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन

जनविकास सेवाभावी संस्थेतर्फे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी :
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जनविकास सेवाभावी संस्था, जामखेड यांच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त महिला भगिनींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम गोरोबा टॉकीज समोर, संस्थेच्या कार्यालय येथे होणार असून, या उपक्रमातून सामाजिक ऐक्य, स्नेहभाव आणि परंपरेचा सन्मान जपण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. मकर संक्रांती हा सण आपुलकी, समता आणि सौहार्दाचा संदेश देणारा असून, महिलांना एकत्र येण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम एक व्यासपीठ ठरणार आहे.
या हळदी-कुंकू कार्यक्रमास जामखेड शहर व परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.



