
बीड मधील पोलीस पाटील भरती 22 फेब्रुवारीपासून
सुरू बीड( प्रतिनिधी) : अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या आणि तांत्रिक कारणामुळे रखडलेल्या पोलीस पाटील भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन या भरती प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून,येत्या 22 फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा होणार आहे. 19 जानेवारी रोजी उपविभागीय दंडाधिकारी बीड तथा पोलीस पाटील पदभरती प्रक्रिया समितीच्या अध्यक्षा कविता जाधव यांनी सविस्तर जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली आहे. बीड मधील पोलीस पाटील भरतीला सुरुवात झाली आहे. भरती प्रक्रिया राबवताना महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 आणि संबंधित निर्णयांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश बीड पाटोदा माजलगाव अंबाजोगाई पहिली या पाचही उपविभागी उपविभागातील उपविभागीय दंडाळीकांना देण्यात आले आहेत उपविभाग स्तरावरून अर्जाची छाटणी लेखी परीक्षा आणि मुलाखती पार पडतील लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचीच तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. भरतीचे सविस्तर वेळापत्रक वेळ पुढीलप्रमाणे 19 जानेवारी जाहिरात प्रसिद्धी व प्रवेश प्रक्रिया सुरू 30 जानेवारी अर्ज करण्याची शेवटची मुदत,2 ते 6 फेब्रुवारी अर्जाची छाननी व प्रवेशपत्र वाटप, 22 फेब्रुवारी लेखी परीक्षा, 24 फेब्रुवारी लेखी परीक्षेचा निकाल, 25 ते 28 फेब्रुवारी तोंडी परीक्षा, 2 मार्च अंतिम निवड यादी तथा निकाल इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधून आपला अर्ज दिनांक 30 जानेवारी पर्यंत भरावा असे आवाहन शिक्षण व करिअर कौन्सिलर डॉ. संजय तांदळे यांनी केले आहे.


