बीड
तपनेश्वर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार : उमाताई जाधव

तपनेश्वर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार : उमाताई जाधव
जि.प.प्राथ.शाळा तपनेश्वर येथे मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी:जिल्हा परिषद प्राथमिक तपनेश्वर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कार्य तत्पर राहून पुढील काळातही काम करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव उमाताई जाधव यांनी केले.
आज दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,तपनेश्वर येथे मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमासाठी ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमाताई जाधव, नगरसेवक मोहन पवार, नगरसेविका संगिताताई भालेराव, नगरसेविका नंदाताई होळकर, माजी नगरसेविका राजश्रीताई पवार उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच हळदी-कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम तसेच संगीत खुर्ची स्पर्धा,लिंबू चमचा स्पर्धा,फुगे फोडणे स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रताप पवार,संजय आरेकर,उपाध्यापिका जयश्री पाटील,मंगल सोलंनकर, शितल कदम, रूपाली कांबळे,कल्पना मोरे,स्वाती गोरे,रजनी बागवान तसेच अंगणवाडी सेविका शुभांगी अडाले, शिवकन्या राजगुरु ,गिता जिरेकर,प्रियंका राजुरकर,तब्बो बागवान,बुसरा शेख,मर्जिना शेख,पूजा कुलकर्णी, जयश्री मुकणे,अश्विनी वेदपाठक, रेखा बळे, कविता शेळके,सुनिता गर्जे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.



