बीड
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनातून योग्य दिशा मिळते : सुभाष सानप

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनातून योग्य दिशा मिळते : सुभाष सानप
मोफत प्रियदर्शी बहुजनवादी मिशन स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन –
प्रतिनिधी |बीड
महापुरुषांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे घेवून जात असताना बुध्दीजीवी वर्गाने समाजातील उपेक्षि तांसाठी कार्य करणे आवश्यक आहे.
स्वतःच्या जबाबदारी व्यतिरिक्त सामाजिक दायित्वाचे तत्व आत्मसात करुन सशक्तपिढी घडविण्यासाठी ज्ञानदानाचे कार्य करणे, विशेषतः स्पर्धा परिक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याने विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन बीड शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी केले.
रविवार (११ जानेवारी) रोजी बीड येथील धानोरा रोड भागात प्रा.अशोक गायकवाड व प्रो.डॉ.राणी जाधव- गायकवाड यांच्या मोफत प्रियदर्शी बहुजनवादी मिशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन मा.सुभाष सानप सहा.पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा बीड.यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी प्रियदर्शी मोफत वाचनालय देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या आधी देखील गायकवाड दांपत्यांनी विहार तिथे वाचनालय,करोना काळामध्ये मध्ये 100 कुटुंबाना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप, 1000 बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचे वाटप, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आर्थिक मदत शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचीगोडी लागावी म्हणून चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धाचे आयोजन स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज दिनविशेष उपक्रम असे त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत आणि आता हा उपक्रम सुरू करून प्रा.अशोक गायकवाड आणि प्रो. डॉ.राणी जाधव- गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष से. नि मुख्यकार्यकारीअधिकारी पी.व्ही. बनसोडे, प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप तरकसे, अशोक ठोकळ, होते जी.एम भोले, उपप्राचार्य उत्तम साळवे, कल्याण भंडारे, बि.डी तांगडे, सूर्यकांत जोगदंड, मस्के, वैशालीई शिंदे, तेजस वडमारे, के एस वाघमारे, अंकुश कोरडे, दादाराव गायकवाड, संतोष निकाळजे, रवी किरण जाधव, विद्या जाधव हे उपस्थित होते. पुढे बोलताना सानप यांनी स्पर्धा परिक्षेत मार्गदर्शन आणि अभ्यासातील सातत्य या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अशोक गायकवाड सुत्रसंचलन किशोर वाघमारे यांनी तर आभार प्रो.डॉ. राणी जाधव -गायकवाड यांनी केले.
चौकट
—————-
विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करून अधिकारी व्हावे – पी व्ही बनसोडे
अशा समाजशील उपक्रमाची समाजाला गरज आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करणे गरजेचे आहे. आणि चिकाटीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र खूप मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल. या केंद्रातून निश्चित मोठमोठे अधिकारी घडतील त्यात शंका नाही.पी.व्ही बनसोडे यांनी अध्यक्षीय समारोपात असे प्रतिपादन केले.



