बीड
गुजर समाजाचे जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

बीड (प्रतिनिधी)-गुजर समाजाचे जिल्हाध्यक्ष झाल्या मुळे शिवसेनेच्या व सर्व समाज बांधवांच्या वतीने रतन गुजर यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम गुजर समाजाचे पहिले जिल्हाध्यक्ष हनुमान बहिरवाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलेले रतन गुजर यांची नुकतीच अखिल भारतीय गुर्जर देवसेना संघटनेकडून बीड जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी सत्कार करुन म्हटले की, मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे आणि तुम्ही गुजर समाजाचे जिल्हाप्रमुख आहात आपले दोघांचे काम आहे समाजकारण या कार्यामध्ये आपल्याला कोठेही अडचण आल्यास शिवसेना एक परिवार म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील व तुमच्या समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शिवसेना तुमच्या बरोबर आहे तसेच याप्रसंगी गुजर समाजाचे पहिले जिल्हाध्यक्ष हनुमान बहिरवाळ यांनीही आम्ही आता मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावू तुम्ही काम करत राहा तुमच्या पाठीशी सर्व समाज उभा राहील असे आश्वासन दिले यावेळी तरी या कार्यक्रमाला विनायक गुजर, सुनील गुजर, हनुमान बजरंग गुजर, लक्ष्मण बहिरवाळ व सर्व समाज बांधव उपस्थित होते