बीड

गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची सुवर्णमहोत्सवी सर्वसाधारण सभा विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न

गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची सुवर्णमहोत्सवी सर्वसाधारण सभा विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न
गेवराई (प्रतिनिधी)  गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची ५० वी सुवर्णमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात दोन सत्रांत खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
या ऐतिहासिक सभेचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी चेअरमन नारायणराव मोटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते शिवराजदादा पवार उपस्थित होते. याशिवाय माजी गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ गर्कळ, गंगापूरचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, विस्तार अधिकारी भीमराव नांदुरकर पत्रकार भागवत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वरिष्ठ अधिकारी लाईदवार, कैलास रहाडे आणि राहुल लिंगसे यांचाही विशेष सहभाग होता. तर माजी आ.अमरसिंह पंडित यांनी शुभेच्छा संदेश पाठवून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान वर्ष २०२४-२५ मध्ये पतसंस्थेला ₹२.९८ कोटी ढोबळ नफा व ₹१.५६ कोटी निव्वळ नफा झाला. या नफ्यातून ८% लाभांश थेट सभासदांच्या बँक खात्यात १४ जुलै रोजी वर्ग करण्यात आला.
संस्थेचे एकूण कर्जवाटप – ₹४८.५४ कोटी, १००% वसुली व NPA – ०.००१६%, दरमहा वसुली – १.६५ कोटी, भागभांडवल – २३.५० कोटी, एकूण ठेवी – २६.४४ कोटी एवढ्या आसून  येत्या काळात ५० कोटींच्या ठेव संकलनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असल्याचे चेअरमन विष्णू खेत्रे यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेचा सविस्तर अहवाल सादर केला.
तसेच कर्ज मर्यादेत वाढ करत डिजिटल सुविधा सुरु करण्यात आली. सभासदांच्या गरजा लक्षात घेऊन कर्ज मर्यादा १६ लाखांवरून १९ लाखांपर्यंत वाढवली आहे. संस्थेने gtsspmg.co.in ही नवीन वेबसाइट व मोबाईल अ‍ॅप सुरू करून मोबाईल बँकिंग, कर्ज अर्ज अपलोड, खाते माहिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त पतसंस्थेने विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आसून यामध्ये शिक्षक कल्याणनिधी व कुटुंब सुरक्षा योजना राबवत यातून ५७ कुटुंबांना एकूण ₹१.९३ कोटींचा आधार दिला. संस्थेने वृक्षारोपण संकल्प करत एक हजार झाडांचे लक्ष्य ठेवले असून यापैकी ५१५ झाडांची लागवड पूर्ण केली आहे.
तसेच रक्तदान शिबिर घेत ८० शिक्षकांचा सहभाग घेऊन गरजूंना रक्तदान कार्ड वितरण करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान माजी मंत्री बदामराव पंडित यांनी संस्थेच्या सहकार चळवळीतल्या योगदानाचे कौतुक करत राज्यभर नाव मिळवण्याच्या शुभेच्छा दिल्या. शिवराजदादा पवार यांनी संस्थेचा आदर्श इतर पतसंस्थांनी घ्यावा, असे वक्तव्य केले.
यशस्वी कारभारामागे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचा वाटा असून
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विष्णू खेत्रे, उपाध्यक्ष विष्णू आडे आणि सचिव अर्जुन जाधव यांच्या नेतृत्वात संचालक मंडळाने चोख कारभार सांभाळला. माजी पदाधिकारी सुभाष शिंदे, अर्जुनराव बारगजे, बाळासाहेब दहिफळे, संगीता कावळे, दक्षा वानखेडे  , शारदा ननवरे, सचिन दाभाडे ,नितीन तीबोले ,जितेंद्र  दहिफळे,
विकास घोडके , अच्युत अर्दड,शेख असिफ , शिवाजी झेंडेकर यांचे सर्वांचे महत्त्वाचे योगदान उल्लेखनीय राहिले.
कार्यकारी व्यवस्थापक शामराव कुलकर्णी यांची ३४ वर्षांची सेवा ३१ जुलै रोजी संपणार असून, त्यांच्या समर्पित कार्याचा सभेत गौरव करण्यात आला.
सभेच्या द्वितीय सत्राचे सुत्रसंचालन सचिव अर्जुन जाधव यांनी केले. सर्व विषयपत्रिकेतील ठराव सभासदांनी बहुमताने संमत केले. उपाध्यक्ष विष्णू आडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने आमसभेची सांगता झाली.
पतसंस्थेने सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने नव्या उंचीचा निर्धार केला असून, पुढील वाटचाल अधिक समृद्ध, डिजिटल व समाजाभिमुख असेल, हे स्पष्टपणे दिसून येते.
चौकट
—————–
गुणवंत विद्यार्थी, आदर्श शाळांचा सत्कार
—————————-
नवोदय, शिष्यवृत्ती, १०वी/१२वी परीक्षांतील गुणवंत विद्यार्थी, NEET, IIT, क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थी यांचा विशेष सन्मान झाला. ‘माझी शाळा सुंदर शाळा’, ‘पीएम श्री शाळा’, ‘आदर्श शाळा’ म्हणून निवड झालेल्या शाळांच्या शिक्षक, मुख्याध्यापक, समिती सदस्यांचा गौरव करण्यात आला.
चौकट
————-
माजी संचालक व सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान
————-
पतसंस्थेच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीतील माजी संचालक, पदाधिकारी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच तालुक्यातील २४ सेवानिवृत्त शिक्षकांनाही विशेष सन्मानपत्र देण्यात आले.
Back to top button