बीड
राष्ट्रीय सेवा योजना शिबीरामध्ये प्राचार्य बाळासाहेब चवार यांचे ” पाणलोट क्षेत्र व्यवस्थापना “वरील व्याख्यान संपन्न

पाटोदा दिनांक १५ जानेवारी रोजी, येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी (न.) संचलित, वसंतदादा पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे चुंबळी येथे” युवा व शाश्वत विकास विशेष लक्ष पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकास ” या उपक्रमानुसार राष्ट्रीय सेवा योजना सात दिवशीय विशेष शिबीर मौजे चुंबळी ता. पाटोदा जि. बीड येथे सुरू आहे. या शिबिरामध्ये तिसऱ्या दिवशीच्या उपक्रमात सकाळच्या सत्रामध्ये चुंबळी शिवारात वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान करण्यात आले. विद्यार्थ्यांची श्रमावरील निष्ठा आणि आत्मविश्वास यावेळी दिसून आला.
दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये सरस्वती महाविद्यालय तेलगाव येथील प्राचार्य बाळासाहेब चवार यांचे” पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन “या विषयावरील व्याख्यान पार पडले. या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चौधरी हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सोमनाथ लांडगे यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये प्राचार्य बाळासाहेब चवार यांनी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन याविषयी बोलताना,” पाणी हे संसाधन असून त्याचा अमर्याद वापर भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण करू शकतो, पाणलोट क्षेत्रामध्ये जमीन, माती, पाणी,जंगल आणि परिसंस्थेचे संवर्धन करणे हे महत्त्वाचे असते, अन्यथा पाण्यासाठी पुढील पिढीला यासाठी संघर्ष करावा लागेल, एवढेच नव्हे तर भविष्यात पाण्यासाठी युद्धही होऊ शकतात. ” अशाप्रकारची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपमध्ये प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चौधरी यांनी पाणलोट आणि जमिनीची धूप याविषयी मनोगत व्यक्त करताना, ” सिंचनाचे महत्त्व वाढावे व पडीक जमिनीचा विकास व्हावा.” अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. जालिंदर लोणके यांनी केले, तर प्रा.प्रदीप मांजरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील कार्यक्रमाधिकारी प्रा. मनिषा गाडवे, डॉ. चंद्रशेखर बनसोडे, प्रा. गोकुळ कंठाळे प्रा. विनोद उगले, डॉ. जगदीश कावरे, याशिवाय राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक शिबिरार्थी कु. भारती बांगर कु.प्रिया पवार , कु. रोशनी तागड कु. भाग्यश्री नागरगोजे, प्रसाद खाडे, ओम घुले इत्यादीनी परिश्रम घेतले.