सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये मोफत दंत तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

सभापती प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेडमध्ये मोफत दंत तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
नगरसेविका नंदाताई होळकर आयोजित मोफत दंत तपासणी शिबिर यशस्वी
जामखेड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड नगरपरिषद जामखेड प्रभाग सातच्या नगरसेविका सौ. नंदाताई प्रविण होळकर व साधना दातांचा दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंत तपासणी शिबिर रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.
जामखेड शहरातील जनतेसाठी करण्यात आलेल्या मोफत दंत तपासणी शिबिराचा प्रभाग क्रमांक सातसह शहरातील दाताच्या समस्यांनी ग्रस्त रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही तालुक्यांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व लोकोपयोगी उपक्रम होत आहेत. त्याच अनुषंगाने जामखेड शहरातील स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण होळकर यांच्या सौभाग्यवती व जामखेड नगर परिषदेच्या नगरसेविका नंदाताई होळकर यांनी जामखेड शहरातील नागरिकांसाठी साधना दातांचा दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराचे उद्घाटन व प्रतिमापूजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात दंत तपासणीसाठी डॉ. श्रुती रोहित देशमुख यांनी सेवा दिली. यावेळी नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी व माजी नगरसेवक अमित चिंतामणी, नगरसेवक व गटनेते तात्याराम पोकळे, श्रीराम डोके, अशोक शेळके,ॲड. प्रविण सानप, पोपट राळेभात, मनोज कुलकर्णी, प्राचार्य विकी घायतडक, हर्षद काळे, मोहन पवार, अर्जुन म्हेत्रे, संजय काशिद, सागर टकले, संतोष गव्हाळे आदी मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.अजय काशिद, प्रविण चोरडिया, संजय राऊत, चिटणीस विजय कुलकर्णी, पवन राळेभात, माऊली अंदुरे, डॉ. महेश मासाळ, केदार रसाळ, गणेश डोंगरे, संजय परदेशी, बंडू डांगरे, शरद माने, अनिकेत जाधव, बाळासाहेब गायकवाड, महेंद्र आदे, दिपक टेकाळे, निलेश तवटे, सागर अंदुरे, गणेश जोशी, संदीप जोशी, रोहित देशमुख, बापूसाहेब कुलकर्णी यांच्यासह प्रभाग ७ मधील नागरिक व स्वराज प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेविका नंदाताई होळकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, अमित चिंतामणी, संजय काशिद व डॉ. श्रुती रोहित देशमुख यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन देशमुख यांनी केले. आभार स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण होळकर यांनी मानले.



