बीड

अजितदादा कुंपणच शेत खातंय! वृक्षलागवड एकी बाजूला आणि वृक्षतोड दुसरीकडे जोरात – सा मिल चालक व वनविभागाच्या मिलीभगतीचा कट? :- डॉ.गणेश ढवळे 

अजितदादा कुंपणच शेत खातंय! वृक्षलागवड एकी बाजूला आणि वृक्षतोड दुसरीकडे जोरात – सा मिल चालक व वनविभागाच्या मिलीभगतीचा कट? :- डॉ.गणेश ढवळे
—-
बीड (दि.०६) :हरित महाराष्ट्राच्या धर्तीवर “हरित बीड अभियान” राबवून पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये उद्या (दि. ७) ३० लाख वृक्ष एका दिवसात लावण्याच्या उद्दिष्टासह वर्षभरात १ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प जिल्हा प्रशासनाने जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात बीड जिल्ह्यात अवैध वृक्षतोडीचे रॅकेट बिनबोभाटपणे सुरू असून वनविभागातीलच काही अधिकारी आणि सा मिल चालकांची मिलीभगत यात असल्याचा गौडबंगाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी उघड केला आहे.
केवळ २.५% वनक्षेत्र – मग झाडं कुठे गेली?
बीडमध्ये जिथे ३३% झाडांची घनता असायला हवी तिथे गेली ५–६ वर्षे फक्त २.५% वृक्षच शिल्लक आहेत. अवैध लाकूड तस्करी आणि वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असतानाही वनविभाग कारवाई टाळतो, हेच ‘कुंपणच शेत खात आहे’ याचे जिवंत उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली.
नियम फक्त कागदावर…
सा मिल सुरू करण्यासाठी परवान्यांसोबत काटेकोर अटी असतात.
प्रत्येक मिलवर तपासणीसाठी वन विभागाचा कर्मचारी नियुक्त असतो.
लाकूड वाहतुकीसाठी वैध व्हन पास, रोख-पावत्यांची नोंद, नियमित वह्या तपासणी– हे सर्व बंधनकारक.
पण प्रत्यक्षात –
तपासणी होत नाही.
कर्मचारी-सा मिल चालकांच्या संगनमताने नियमांना पायदळी तुडवलं जातं.
गोल, चिरलेले किंवा वाया गेलेले लाकूड बिनदिक्कतरीत्या ठेवले जाते.
खोटी हरित प्रतिमा?
डॉ. ढवळे यांचा आरोप आहे की “एका हाताने झाड लावा म्हणणारे प्रशासन दुसऱ्या हाताने झाडं तोडणाऱ्यांचे संरक्षण करते” – म्हणूनच अजितदादांनी स्वतः लक्ष घालून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत सा मिलवर नियमित तपासणी आणि कठोर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
Back to top button