बीड
ग्रामरोजगार सेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा – कॉ. भाऊराव प्रभाळे

ग्रामरोजगार सेवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा – कॉ. भाऊराव प्रभाळे
बीड (प्रतिनिधी) MGNAREGA बंद करून VB-GRAM-G कायद्यात बदल केला. मात्र अमलबजावणीच्या पातळीवर काहीच बदल झालेला नाही. उलट जास्तीच्या पळवाटा VB-GRAM-G मध्ये आहेत. मजुराची दोन वेळा हजेरी घेण्यासाठी NMMS प्रणाली विकसित केली त्या प्रणालीमध्ये खूप त्रुटी आहेत. NIC त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे यापूर्वीही या संबंधाने निवेदन दिले होते. NMMS प्रणालीमध्ये बाह्य आपलिकेशन द्वारे प्रवेश करून हजेरी आणि स्थळ (लोकेशन) मध्ये छेडछाड होत आहे आणि त्याची जबाबदारी पूर्णतः रोजगार सेवकावर टाकण्यात येत आहे. यामध्ये माफियागिरी वाढलेली असून यांचा शिरकाव थांबवणे ही जबाबदारी निश्चित नाही.
प्रमाणिकपणे काम करणाऱ्या रोजगार सेवकावर खोटे आरोप करून त्याची सुनावणी न घेता किंवा त्याची म्हणणे ऐकून न घेता अतिरिक्त रोजगार सेवक नेमला जातो. बीड जिल्ह्यात 15 ते 20 रोजगार सेवकावर हल्ले झाले असून त्याचे गुन्हे नोंद केलेले आहेत याचे मुख्य कारण प्रशासनाने VB-GRAM-G म्हणजेच मनरेगा मोकाट सोडलेली आहे. कोणत्याच प्रकारची पडताळणी होत नसल्याने सर्व भार ग्राम रोजगार सेवकांच्या वर आहे आणि मानधन कमी जबाबदारी मोठी असा प्रकार झालेला आहे.
यासोबत केवायसी पूर्ण केलेल्या रोजगार युवकांना कार्यमुक्त केले होते मात्र प्रगती अहवाल दिल्यानंतरही सेवेत रुजू केले नाही. याचा फायदा घेऊन सरपंच मंडळींनी आपल्या मर्जीतले लोक नियुक्त केले आहेत. कुशल बिलाची जबाबदारी नको फक्त अकुशल म्हणजे हजेरी एवढीच जबाबदारी.
परस्पर हजेरी NMMS मधील त्रुटी ची जबाबदारी NIC ने स्वीकारावी.
कामाच्या अनियमित ते मध्ये मजुरापासून ते वरिष्ठापर्यंत सर्वांवर कारवाई व्हावी. फक्त रोजगार सेवक कार्यमुक्त करून चालणार नाही.
गाव पातळीवर ग्राम रोजगार सेवकावर होणाऱ्या मारहाणी ला शासकीय कामात अडथळा (३५३) प्रमाणे गुन्हा नोंद व्हावा. इत्यादी मागण्यांना घेऊन बीड जिल्ह्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करणार आहेत असे प्रसिद्धी पत्रकातून बीड जिल्हा ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भाऊराव प्रभाळे यांनी म्हटले आहे.



