📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

श्रीवर्धनचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांच्या निवासस्थानी मोरया भजन मंडळाची भजनसेवा; शिवसेना शहरप्रमुखांची विशेष उपस्थिती

श्रीवर्धनचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांच्या निवासस्थानी मोरया भजन मंडळाची भजनसेवा; शिवसेना शहरप्रमुखांची विशेष उपस्थिती
​श्रीवर्धन(संदेश घोलप):श्रीवर्धन शहराचे प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष ॲड. अतुल अरविंद चौगुले यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेताना गणेशोत्सवाचा डिजिटल व भक्तीमय उत्साह पाहायला मिळाला. या शुभप्रसंगी श्रीवर्धन येथील सुप्रसिद्ध ‘मोरया भजन मंडळ’ यांनी श्रींच्या चरणी आपली सेवाभावी भजनसेवा अर्पण करत गणरायाला मनोभावे वंदन केले.
​नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. मोरया भजन मंडळाने गायलेल्या तल्लीन करणाऱ्या भजनांनी आणि गजराने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
​या भक्तिमय सोहळ्याला शिवसेना शहरप्रमुख शिवराज संदीप चाफेकर हे विशेषत्वाने उपस्थित होते. त्यांनी गणरायाचे भाविकतेने दर्शन घेऊन चौगुले परिवाराला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परिसरातील नागरिक, पदाधिकारी व चौगुले परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button