बीड

देऊळगाव घाट येथे आ.सुरेश धस यांच्या हस्ते नवीन पुलाचे भूमिपूजन

देऊळगाव घाट येथे आ.सुरेश धस यांच्या हस्ते नवीन पुलाचे भूमिपूजन

आष्टी (प्रतिनिधी)
तालुक्यातील देऊळगाव घाट येथे नृसिंह मंदिराशेजारी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी आ.
सुरेश धस यांच्या हस्ते संपन्न झाले.मतदारसंघातील विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या कामाला मंजुरी मिळाली.
सावरगाव – शेडाळा – देऊळगाव घाट – पिंपळगाव – वडगाव (प्रजिमा-६५, कि.मी. १२/००) या मार्गावर सुमारे १ कोटी ५० लाख रुपये खर्चून पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. या पुलामुळे परिसरातील दळणवळण अधिक सुरक्षित व जलद होणार असून शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.पहिला जीर्ण झालेला पूल हा वाहतुकीसाठी धोक्याचा बनला होता.
याच बरोबर, देऊळगाव घाट येथे सुमारे १० लाख रुपये खर्चून सभागृह उभारण्यात येत असून त्या कामाचे देखील भूमिपूजन यावेळी करण्यात आले.या सभागृहामुळे स्थानिकांना सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.तर दौलावडगाव येथे 40 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नदी वरील पुलाचे लोकार्पण देखील करण्यात आले.यावेळी बोलताना आ.धस म्हणाले की,भविष्यातही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला कृषिभूषण बाबासाहेब पिसोरे,अशोक इथापे,महेश म्हस्के, कारखेल सरपंच रघुशेठ घुले,अशोक दहातोंडे,शिवाजी थोरात,विजय दानवे,सुखदेव खकाळ, सालेवडगाव सरपंच महेश कराळे,छगन बागले,गोवर्धन ठोंबरे, आबा शिंदे,रावसाहेब शिरसाठ, घाटा पिंपरी सरपंच मोहन आमटे,नाना आमले,अजिनाथ वायभासे,मोहन मराठे,बबलू कुरेशी,एकनाथ वाणी, गोटीराम कोहोक,बाबू खान, वहाब पटेल,जलील कुरेशी,प्रवीण वाणी, अभिमन्यू परभणे, विशाल उमाप, बाळू मुळे,शरद दहातोंडे,यांच्यासह आदी ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button