प्रवीण होळकर यांच्या पुढाकाराने करमाळा-जामखेड पायी ज्योतचे भव्य स्वागत

प्रवीण होळकर यांच्या पुढाकाराने करमाळा-जामखेड पायी ज्योतचे भव्य स्वागत
स्वराज प्रतिष्ठानचे १७ वर्षांपासून समाजभिमुख उपक्रम
स्वराज प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी –जामखेड शहरातील तपनेश्वर येथील स्वराज प्रतिष्ठान सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती व भाजपा चे जामखेड तालुका चिटणीस युवा नेते प्रवीण होळकर यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवानिमित्त करमाळा येथील कमलाईदेवी ते जामखेड पायी ज्योतचे आयोजन करण्यात आले.यावेळी भक्तिमय वातावरणात सिध्दीविनायक प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश देशमुख व सचिन देशमुख यांनी सपत्नीक ज्योत घेवून आलेल्या भक्तांचे पाय धुवून तसेच ज्योती बरोबरचे सर्व भक्तांना गुलाल लावून हार फुलाने ज्योत ची पूजा करून स्वागत केले.होते.शहरात पायी ज्योतचे भव्य स्वागत करण्यात आले
तसेच सायंकाळी पहिल्या माळीला जगदंबा देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना शहरातील प्रसिद्ध युवा उद्योजक सचिन शास्त्रकार व त्यांच्या सौभाग्यवती योगिता सचिन शास्त्रकार यांच्या हस्ते महाआरती करून करण्यात आली.पायी ज्योत चे पहिले वर्ष असून यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे बोलताना प्रविण होळकर यांनी सांगितले.
यावेळी भाजपा शहर मंडलध्यक्ष संजय काशिद, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. संजय राऊत, नगरसेवक मोहन पवार, आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना, आण्णासाहेब ढवळे,शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, युवा उद्योजक नितीन शास्त्रकार, अनिकेत जाधव, बाळासाहेब गायकवाड, शरद माने, सचिन देशमुख, आकाश बागडे,शैलेंद्र मोरे, राजेंद्र परदेशी, संदीप कुमटकर, भरत औटे, शांतीनाथ वाघ, गोकुळ भस्मे, धिरज जाधव, अमोल लोहार, अनिरुद्ध रसाळ, गोकुळ गुळवे, विश्वा शिरोळे, गणेश पवार, कान्हा श्रीरामे, करण कळसकर, अवधूत वासकर, सौरभ नागरगोजे, हर्षल शास्त्रकार, धनंजय जाधव, संतोष राऊत, विनोद पोले, अक्षय शेळके, अतिश कोळपकर,उत्तम परदेशी,
गणेश वासकर, अतुल लोहार, सागर बाबर, राहुल जायगुडे, आयुष लोहार, दत्तात्रय जाधव, संतोष होळकर, धनंजय बोबडे, भरत राऊत, अनिल लोहार, अमोल बोरकर, संजय डांगरे, संतोष शेळके, नाना कोळपकर, वैभव आष्टेकर, स्वप्निल राजूरकर, शिवाजी मुळे, सुभाष थोरात, गणेश भस्मे, गणेश हगवणे, दादा हापटे, महेश परदेशी, नितीन शिंदे, बंडू नेटके,दादासाहेब वीर, दीपक कळसकर, संदीप परदेशी, राजेंद्र लोहार, विशाल पवार आदी मान्यवर, कार्यकर्ते व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या १७ वर्षांपासून स्वराज प्रतिष्ठान गणेश उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहे.



