ना. भरतशेठ गोगावले यांच्या रो.ह.यो. खात्याला १०० % यश गोरेगांव विभागातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष

*ना. भरतशेठ गोगावले यांच्या रो.ह.यो. खात्याला १०० % यश*
*गोरेगांव विभागातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष*
प्रसिद्धी प्रमुख – लवेश साळवी
दि. ०४ मे २०२५, मौजे गोरेगांव, कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, नामदार भरतशेठ गोगावले यांच्या रोजगार हमी मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसाच्या कालावधी मध्ये, अव्वल क्रमांक मिळवून १०८% उद्दिष्ट पूर्ण केले. याच पार्श्वभूमीवर व जनता दरबारचे पहिल्या दिवसाला लक्ष्यात घेऊन, शनिवारी सायंकाळी, शिवसेना कार्यालय गोरेगांव येथे, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आतिषबाजी करीत, एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोदभाई घोसाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत भरतशेठट्या असीम ताकदीबद्दल सांगत, जनता दरबाराला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, शिवसैनिकांना संबोधित केले. या कार्यक्रमाला उपतालुका-प्रमुख जगदीशभाई दोशी, विभाग प्रमुख दिनेशभाई हरवंडकर, अल्पसंख्याक तालुका प्रमुख सज्जाद गोडमे, उद्योजक वामन बैकर, मा. सरपंच जगदीश भोकरे, मा. ग्रामपंचायत सदस्या वंदना ताई शेठ, शहर प्रमुख सचिन शिगवण, युवा सेना विभाग प्रमुख केतन बामणोलकर, युवा सेना शहर प्रमुख समीर रातवडकर, ज्येष्ठ शिवसैनिक नथुराम बामणोलकर, हिंदुत्ववादी कार्यकर्ते रोहित रातवडकर, धर्मरक्षक आदि साहेब गोरेगांवकर, उद्योजक संजय म्हस्कर, उद्योजक सुशील गावडे, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश यादव, पत्रकार पांडुरंग माने व इतर शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.



