बीड

कन्या विद्यालयाच्या ५४ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक चार वर्षात मिळणार २२ लाख १७ हजार ४०० रुपये

कन्या विद्यालयाच्या ५४ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक

चार वर्षात मिळणार २२ लाख १७ हजार ४०० रुपये

जामखेड प्रतिनिधी -राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा व सारथी परीक्षेमध्ये जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले आहे. सन २०२४-२०२५ वर्षाचा निकाल जाहीर झाला असून, ५४ विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले आहेत. केंद्र सरकारच्या एनएमएसएस परीक्षेत १५ विद्यार्थिनींनी तर सारथी शिष्यवृत्तीत ३९ विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे.

एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी १२०००प्रमाणे इयत्ता ९ वी ते १२ वी या चार वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. सारथी शिष्यवृत्ती पात्र ३९ विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी ९,६०० प्रमाणे चार वर्षे ३८,४०० शिष्यवृत्ती मिळणार आहेत.
या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख बाबासाहेब आंधळे, विषय शिक्षक विलास पवार,मिरा साळुंके, रश्मी मुसळे, प्रशांत पोकळे,विशाखा ससाणे, अर्चना शिंदे, मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी भोर, पर्यवेक्षक तथा तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापक संजय हजारे, माजी मुख्याध्यापिका श्रीमती कुसुम चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनींचे आमदार रोहित पवार, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहायक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडे, काकासाहेब वाळुंजकर, सल्लागार समिती सदस्य राजेंद्र कोठारी,स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन प्रा.मधुकर राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा दिपाली सांगळे ,शाळा सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ आदींनी कौतुक केले.

Back to top button