ना.पंकजाताई मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन महाशिवरात्री निमित्त परळीत शिवभक्तांची मांदियाळी

महाशिवरात्री निमित्त परळीत शिवभक्तांची मांदियाळी
परळी वैजनाथ दि. १५..
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज महाशिवरात्री निमित्त राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपर्यातून लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेतले. वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष व तहसीलदार व्यंकटेश मुंडे, विश्वस्त राजेश देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले.
*सेल्फी घेण्यासाठी महिला भाविक युवक, युवतींची झुंबड*
————
पंकजाताई मुंडे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात जमा झालेल्या महिला, युवक, युवती व सर्व सामान्य नागरिकांनी त्यांचेसोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांना एकच गराडा घातला. सेल्फीसाठी प्रत्येकांची झुंबड उडाली होती, पंकजाताईंनी देखील यासाठी सर्वांना आवर्जून मनसोक्त वेळ देत सर्वांची इच्छा पूर्ण केली तसेच भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
*भाविकांना खिचडीचे वाटप*
——
भाविकांना उपवासाची खिचडी मोफत वाटप करण्यासाठी परळी नगरपरिषद तसेच भाजपचे युवा नेते निळकंठ चाटे यांनी उभारलेल्या स्टॉलला ना. पंकजाताई मुंडे यांनी भेट दिली, त्यांच्या हस्ते दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले.



