बीड

जिल्ह्यात धुवाँधार पाऊस; सीना नदीला पूर; कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी पहा…

जिल्ह्यात धुवाँधार पाऊस; सीना नदीला पूर; कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी पहा…

रविवारी झाला ४३ मिलीमिटर पाऊस | जिल्ह्यात सरासरी १७०.६ मिलीमिटर पाऊस

अहिल्यानगर | :-गेल्या दहा-बारा दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवार-रविवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे गावोगावच्या नद्याही वाहत्या झाल्या. रविवारी जिल्ह्यात ४३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली तर आत्तापर्यंत जिल्ह्यात १७० मिलीमिटर पाऊस झाला आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. तसेच नगर शहर व नगर अहिल्यानगर तालुक्यात सीना नदीच्या उगमस्थानी सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे.

गेल्या दहा-बारा दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात संततधार सुरु आहे. शनिवारी १२ महसूल मंडलात अतिवृष्टी झाली तर रविवारी २९ मंडलात अतिवृष्टी झाली आहे. खेड महसूल मंडलात १३६.३ सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. पुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे तर २९ व ३० मे रोजी हलका व मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.

२३ मंडलात अतिवृष्टी
भिंगार ७३.३, नागापूर ७५, चिचोंडी ६६.३, चास ९३, नेप्ती ७२.८, पारनेर ६८.३, भाळवणी ९०.५, सुपा ७७, वाडेगव्हाण ६२.५, कान्हूर पठार ६०, पळवे खु. ६६, पेडगाव ९४, देवदैठण ७६.८, भानगाव ८२.८, आढळगाव ८२.८, कर्जत १०३, भांबोरा ८४.५, कोंभळी ७४.३, माही ७२, वालवड १०३, खेड १३६.३, करंजी ६०.८, मिरी ६२.५, तिसगाव ६०.३, सोनई ६२.३, राहुरी ६४.८, टाकळीमिया ६४.८, ब्राम्हणी ६५, वांबोरी ६३.५ मिलीमिटर पाऊस झाला.

रविवारी झालेला तालुकानिहाय पाऊस
नगर ५२.४, पारनेर ६२.६, श्रीगोंदा ५७.४, कर्जत ७२, जामखेड ३२, शेवगाव ४८, पाथर्डी ४२.२, नेवासा ४०.४, राहुरी ४८.८, संगमनेर ३२.१, अकोले ३५.७, कोपरगाव १३.५, श्रीरामपूर ८.२, राहाता १२.९ मिलीमिटर पाऊस झाला.

Back to top button