बीड
जागतिक पहिले वृक्षसंम्मेलन भरलेल्या सह्याद्री देवराई वनप्रकल्पाला घरघर ; दिड वर्षांपासून झाडांना पाणी मिळेना वनविभागासह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेशरमांची झाडे लावा लक्ष्यवेधी आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे

जागतिक पहिले वृक्षसंम्मेलन भरलेल्या सह्याद्री देवराई वनप्रकल्पाला घरघर ; दिड वर्षांपासून झाडांना पाणी मिळेना वनविभागासह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेशरमांची झाडे लावा लक्ष्यवेधी आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे
—-
बीड:- ( दि.१७ ) बीड तालुक्यातील पालवण येथील डोंगरावर २०१७ साली मराठी अभिनेते सयाजी शिंदे आणि सिने पटकथा लेखक अरविंद जगताप यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या आणि पहिले जागतिक वृक्षसंम्मेलन भरलेल्या
सह्याद्री -देवराई वनप्रकल्पाकडे वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष असुन वनप्रकल्पाला घरघर लागली असुन वाळवंट होण्याच्या स्थितीत असुन पाण्याअभावी झाडे वाळली आहेत त्यामुळे पाण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधुन निधीची तरतूद करण्यात यावी तसेच डोंगराला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असुन आवश्यक उपाययोजना करण्यात यावी आणि पालवण -पिंपळवाडी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मॉर्निंग वॉक साठी नागरीक तसेच योगा ग्रुपने मॅरेथॉन स्पर्धेकडे पाठ फिरवली असुन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या प्रमुख मागण्यांकडे जिल्हा प्रशासन व वनविभागाचे लक्ष्य वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१७ सोमवार रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “
बेशरमांची झाडांची लागवड करत लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी बीड शिवकुमार स्वामी यांच्या मार्फत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात शेख युनुस,सुदाम तांदळे, रामनाथ खोड, शेख मुबीन, पांडुरंग हराळे,शेख मुस्ताक ,शिवशर्मा शेलार आदी सहभागी होते.
जिल्हा नियोजन समितीमधून झाडांना पाण्याची तरतूद करण्यात यावी
—-
बीड जिल्ह्यात दिड टक्का वनक्षेत्र असुन दुष्काळाचे वारंवार संकट ओढावत आहे.जिल्ह्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेली आहे. या संकटावर मात करून वृक्ष चळवळ वाढीस लागावी म्हणून बीड तालुक्यातील पालवण येथील डोंगरावर २०१७ साली मराठी अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांच्या प्रयत्नातून ४० एकरात सह्याद्री देवराई वन प्रकल्प उभारला गेला. जगातील पहिले वृक्षसंम्मेलन याच ठिकाणी झाले या प्रकल्पातील १६ एकरात करवंद,पिंपळ,लिंब,महारूक, कांचन यासह स्थानिक प्रजातीच्या ६४ हजार विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.शिवाय १२ हजार झाडांचे घनवृक्षही येथे उभारण्यात आले होते.या प्रकल्पातुन आक्सिजन झोन तयार करून वृक्ष चळवळ निर्माण करण्याचा उद्देश होता.परंतु मागील दिड वर्षांपासून देवराईतील झाडांना पाणीच नसल्याने झाडे वाळली आहेत.जळु लागली आहेत.सह्याद्री देवराई प्रकल्पातील झाडे जगवण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधुन २०१७ नंतर सुरूवातीला केवळ ३ वर्षच निधी मिळाला.त्यानंतर निधीचे प्रयोजन संपले. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमधुन पाण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. दोन वर्षांपूर्वी बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांच्याकडून सह्याद्री देवराई प्रकल्पातील झाडांसाठी २ दिवसाआड १२ हजार लिटर पाण्याचे मोफत टँकर दिले जात होते ते सध्या बंद आहेत.रोटरी क्लब, विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने छोटे मोठे टँकर देऊन पाणी उपलब्ध करून देण्यात येत होते सध्या तेही बंद आहे.
सह्याद्री देवराई वनप्रकल्पातील डोंगराला वारंवार आगीची झळ ; आवश्यक उपाययोजना करण्यात यावी
———
३ वर्षांपूर्वी पालवण येथील सह्याद्री देवराईच्या डोंगराला १२ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारच्या वेळी अचानक लागलेल्या आगीत १८ प्रजातींची ३२३ झाडांना आगीची झळ बसुन १३ मोठ्या झाडांचे नुकसान झाले होते तर १० मार्च २०२२ रोजी गवळवाडी रोपवन आगीत भस्मसात झाले होते तर दि.२५ मार्च २०२३ रोजी लागलेल्या आगीत शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत २०१९ मध्ये पिंपळवाडी रस्त्यावर गवळवाडी येथील सर्व्हे नंबर ३७८ मधील २५ हेक्टर क्षेत्रात उभारलेल्या रोपवनाला दि.०९ मार्च २०२३ रोजी आग लागुन १० एकर क्षेत्रातील ४-५ हजार झाडे जळून खाक झाली होती.
त्यामुळे आगी लागण्याच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी.
पालवण – पिंपळवंडी रस्त्याची दुरावस्था असुन तातडीने दुरुस्ती करण्यात यावी
——-
सह्याद्री देवराई हा हिरवळीने नटलेला परिसर असून येथे वळणदार घाट आणि शुद्ध ऑक्सिजन मिळत असल्याने बीड शहरातील नागरीक मॉर्निंग वॉक साठी मोठ्या प्रमाणामध्ये येत होते परंतु देवराईकडे जाणारा पालवण ते पिंपळवंडी पर्यंत रस्ता उघडल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची संख्या रोडावली आहे. बीडच्या योगा ग्रुपने या ठिकाणी तीन वेळा मॅरेथॉन घेतली होती. या स्पर्धेला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला परंतु खराब रस्ता असल्याने धावपटुंनी सुद्धा देवराई सध्या पाठ फिरवल्याचे पहायला मिळते. त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी



