बीड

प्रभाग क्र.६ मध्ये मतदार मॅपिंग कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग क्र.६ मध्ये मतदार मॅपिंग कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

जामखेड प्रतिनिधी: शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेला मतदार मॅपिंग कॅम्प उत्साहात पार पडला. नगरसेवक तथा पक्षाचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव आणि नगरसेविका संगिताताई भालेराव यांच्या पुढाकारातून या कॅम्पचे नियोजन करण्यात आले होते.

गेल्या आठ दिवसांपासून प्रभागातील नागरिकांना कॅम्पची माहिती देण्यासाठी जनजागृती करण्यात आली होती. याचा परिणाम म्हणून कॅम्पला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे ३२५ मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली मॅपिंग नोंदणी पूर्ण केली.

प्रभागातील १०१, १०२ आणि १०३ या बूथसाठी अनुक्रमे निशा कदम, विठ्ठल जाधव आणि स्वाती गोरे या बीएलओंनी जबाबदारी पार पाडली. कडक उन्हातही नागरिकांनी रांगेत उभे राहून नोंदणी करून घेतली.

यावेळी ॲड.डॉ.अरुण जाधव स्वतः उपस्थित राहून मतदारांना मॅपिंगचे महत्त्व पटवून देत होते.मॅपिंग न झाल्यास भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

बीएलओंनीही समाधान व्यक्त केले. घरोघरी जाऊन अपेक्षित प्रतिसाद मिळत नसताना, या कॅम्पमुळे एका दिवसात मोठ्या प्रमाणावर नोंदणी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी कॅम्पला भेट देत आयोजकांचे कौतुक केले. तसेच काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उर्वरित मतदारांनी मॅपिंग करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली.
या उपक्रमासाठी बापूसाहेब ओहोळ, संगिताताई भालेराव, सागर कांबळे, साहिल जाधव, रजनीताई औटी, मनिषाताई जाधव, मच्छींद्र जाधव, बाबा चंदन, सुमित भालेराव आणि गणेश घायतडक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button