चिंतामणी ज्वेलर्समध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा गोल्डन वेलकम !

चिंतामणी ज्वेलर्समध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा गोल्डन वेलकम !
जामखेडमध्ये डी.वाय.एस.पी. संतोष खाडे यांचा सन्मान
जामखेड (प्रतिनिधी): शहरातील प्रतिष्ठित सराफ व्यापारी आणि नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या चिंतामणी ज्वेलर्स येथे आज, दिनांक ११ जुलै २०२५ रोजी अहिल्यानगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डी.वाय.एस.पी.) मा.श्री. संतोष खाडे यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
सदर भेटीदरम्यान शहरातील सामाजिक, राजकीय व व्यापारी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, ॲड. प्रविण सानप, नगरसेवक गुलचंद अंधारे, ऋषिकेश बांबरसे, गणेश आजबे, शामीर सय्यद, माजी संचालक काकासाहेब गर्जे, उद्योजक गणेशशेठ डोंगरे, व्यापारी अमोल चिंतामणी, इम्रान कुरेशी, मोहन ढाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सत्कार समारंभासाठी जामखेड तालुका वकील संघ, सराफ सुवर्णकार संघटना, संघर्ष मित्र मंडळ, व्यापारी असोसिएशन आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



