बीड

जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेश येताच चौसाळा येथील अतिक्रमण वर हातोडा सुरू झाला 20 वर्षातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहिमेस सुरवात 

जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेश येताच चौसाळा येथील अतिक्रमण वर हातोडा सुरू झाला 20 वर्षातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहिमेस सुरवात
चौसाळा (प्रतिनिधी):- चौसाळा ता.जि. बीड येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण केलेल्या जागेवर शासनाच्या अतिक्रम हटाव मोहिमेनुसार अतिक्रमण केलेल्या जागेवर तसेच रस्त्यावरील उभारलेल्या अतिक्रमणावर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी चौसाळा येथे भेट देऊन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या उद्घाटन ना प्रसंगी ग्रामपंचायत कार्याच्या आजूबाजूला असलेले व शासकीय जागेतील सर्व अतिक्रमण तात्काळ काढून घेण्याच्या आदेश ग्रामपंचायत कार्यालय चौसाळा, तलाठी कार्यालय चौसाळा, व सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांना देताच अतिक्रमण पाडण्यास सुरुवात झालेली आहे मा. तहसीलदार साहेब  बीड  यांच्या आदेशानुसार गावातील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू केले आहे  दिनांक 20 03 2025 रोजी सदर अतिक्रमण हटाव मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्यानुसार ग्रामपंचायत परिसरातील अतिक्रमण असलेल्या जागेवर  मशीनच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्यात आले
गावातील अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या शासकीय जागेवर व मालकी नसलेल्या जागेवर रस्त्यावर ही अतिक्रमण केले आहे गावातील बस स्थानक परिसरातील जागेवर नागरिकांनी आपापले दुकाने थाटले आहेत सदर अतिक्रमण च्या जागेवर अनेकांनी अधिकृतपणे बांधकामे केले आहेत तरी सदरील अतिक्रमण धारकांनी आपले  अतिक्रमण तातडीने एक दिवसात  हलवावे अन्यथा सदर बांधकाम हे जिल्हाधिकारी कार्यालय बीड ग्रामपंचायत  चौसाळा  महसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त नुसार हटविण्यात येईल त्यांच्या बांधकाम  नुकसानभरपाई सर्वस्वी  जबाबदारी अतिक्रमण धारकावर राहील करिता सर्व नागरिकांनी आपले अतिक्रमण एक दिवसात हटवून सहकार्य करावे असे आवाहन  चौसाळ्याचे सरपंच सौ मंगल ताई लोढा उपसरपंच अंकुशराव कळासे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब चव्हाण मंडलअधिकारी   जायभाये साहेब  तलाठी  के  आर निर्मळ यांनी केले आहे.
Back to top button