बीड
मौजे परचुंडी येथे राष्ट्रीय योजनेचे विविध कार्यक्रम संपन्न

मौजे परचुंडी येथे राष्ट्रीय योजनेचे विविध कार्यक्रम संपन्न
परळी वै :येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे
सात दिवसांचे निवासी शिबिर परचुडी येथे संपन्न होत असून यामध्ये विविध विषयांची व्याख्याने ,भावगीत भक्तीगीतेचे कार्यक्रम होत आहेत तसेच व्यायाम, दिनचर्या, व्यसनमुक्तीपर प्रबोधन प्राध्यापकांच्या वतीने करण्यात येत आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ बबन मोहिते आणि सहकार्यक्रमाधिकारी प्रा बबनराव झांजे यांच्या सह डॉ चांगदेव शेळके, डॉ,एस एल मोरे, डॉ मनोज कुमार प्रकाश, डॉ महेश दाडगे, नामदेव फड, सुदर्शन अवस्थी, डॉ रवींद्र मचाले, डॉ.अर्चना चौरे , प्रा अफीया उजमा, प्रा डी एल गिरे , डॉ अनुरथ चंदरे,डॉ पंडित शिरसाठ, डॉ उद्धव मुळे इत्यादींनी विषय विविध विषयावर मार्गदर्शन केले तसेच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, जल व्यवस्थापन या विषयावर विविध कार्यक्रम करण्यात आले. प्राचार्य प्रोफेसर डॉ आबासाहेब हांगे, उप प्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख वक्ते गायक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विद्यार्थ्यांनी परचुंडी येथे शिबिरांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे.


