बीड
“चंपावतीरत्न” पुरस्काराने प्रवीण इंगळे सन्मानित

“चंपावतीरत्न” पुरस्काराने प्रवीण इंगळे सन्मानित
बीड.(प्रतिनिधी) दिवंगत सामाजिक कार्यकर्ते श्री हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या संकल्पनेतून २०२१ साली साकार झालेला “चंपावतीरत्न” पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्याचा मानस त्यांचा होता. श्री हॅरीसन फ्रान्सिस रेड्डी यांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले होते. श्री रेड्डी यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी डॉ संजय तांदळे, (मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष) व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पालीमकर यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय २०२५- २६ मातृभूमी रत्न पुरस्कार व रेड्डीने निश्चित केलेला चंपावती रत्न पुरस्काराचे वितरण सोहळा दि. २४ एप्रिल २०२६ रोजी जागतिक पुस्तकदिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई मोराळे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री सतीश साळुंखे, पोलीस निरीक्षक शिवाजीराव जाधवर, शिक्षक नेते उत्तमराव पवार, प्राचार्य सविता शेटे , श्री रेड्डी यांचे भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. हरिसन फ्रान्सिस रेड्डी यांनी प्रवीण इंगळे यांचे सामाजिक चळवळीतील योगदान, निस्वार्थ भावनेने केलेले काम याची दखल घेतली गेली.२०२१ साली त्यांनी प्रत्यक्ष भेटीत प्रवीण इंगळे यांना सांगितले होते.त्यांच्या अकाली निधनाने हे पुरस्कार रखडले गेले. त्यावेळेस त्यांच्या सानिध्यात असलेले डॉक्टर संजय तांदळे व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पालीमकर हे रेड्डी यांच्या घरी गेले असता चंपावतीरत्न पुरस्काराचे शिल्ड तयार केलेले रेड्डी यांच्या घरी आढळून आले. आणि तो धागा पकडून संजय तांदळे व प्रवीण पालीमकर यांनी हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांचे अधुरे राहिलेले स्वप्न साकार केले.
प्रवीण इंगळे यांचे विविधस्तरातून अभिनंदन होत आहे.



