शिवविचार आत्मसात केल्यासच समाज-राष्ट्राची प्रगती – प्रा. तेजस भोरे

शिवविचार आत्मसात केल्यासच समाज-राष्ट्राची प्रगती – प्रा. तेजस भोरे
सनराईज शैक्षणिक संकुलात शिवजयंती उत्साहात साजरी
जामखेड प्रतिनिधी: तालुक्यातील पाडळी फाटा येथील सनराईज शैक्षणिक संकुलाचे साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, स्व.एम.ई भोरे जुनिअर कॉलेज ,सनराईज् इंग्लिश स्कूल येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
आज दिनांक दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक प्रा. तेजस भोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या अस्मिता जोगदंड आदी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्रा.तेजस भोरे यांनी सांगितले ,छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन कौशल्य, न्यायप्रियता लोककल्याणकारी राज्यकारभार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करूनच समाज व राष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा सादर करत शिवचरित्रावर आधारित भाषणे, देशभक्तीपर गीते, पोवाडे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून शौर्य, स्वाभिमान व राष्ट्रप्रेमाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुनील घाडगे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. विवेक सातपुते यांनी मानले .



