महावीर जयंतीनिमित्त अध्यात्म आणि मानवतेचा संदेश जामखेड येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

महावीर जयंतीनिमित्त अध्यात्म आणि मानवतेचा संदेश
जामखेड येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी
जामखेड – भगवान महावीर हे केवळ धार्मिक गुरु नव्हते, तर ते एक महान आध्यात्मिक मार्गदर्शक होते. त्यांनी जगाला अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रह्मचर्य या पंचमहाव्रतांचा संदेश दिला.त्यांचा ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश आजच्या काळात अधिकच सुसंगत वाटतो. आज जेव्हा जगात तणाव, द्वेष आणि असहिष्णुतेचं वातावरण वाढत आहे, तेव्हा भगवान महावीरांची शिकवण मानवतेसाठी एक प्रकाशस्तंभ ठरते.
आजच्या या पवित्र दिवशी, आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणींचं स्मरण करून, आपल्या जीवनात त्या तत्त्वांना जागा द्यावी. असे प्रतिपादन जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्री. दिलीप गुगळे यांनी केलं.
आज दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी जैन श्रावक संघ व सकल जैन समाज जामखेड यांच्या वतीने भगवान महावीर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ते बोलत होते.
महावीर जयंतीच्या निमित्ताने भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. जयंती निमित्ताने विविध धार्मिक कायर्क्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शरद शिंगवी, आकाश बाफना, संदीप बोगावत आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भगवान महावीर जयंती निमित्ताने येथील जैन मंदिरापासुन महावीरांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज पेठ, जयहिंद चौक, खर्डा चौक ते महावीर भवन येथे मिरवणूकीची सांगता झाली.
जयंती कार्यक्रमाचे नियोजन जैन श्रावक संघ व सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे ,उपाध्यक्ष महावीर बाफना, सचिव शरद शिंगवी, खजिनदार मंगेश बेदमुथ्था, संदीप बोगावत,आकाश बाफना, आनंद गुगळे, संजय गांधी, संतोष फिरोदिया, जितेंद्र बोरा, रविंद्र गादिया,अशोक पितळे, विजय कोठारी, प्रवीण चोरडिया,पिंटू शेठ बोरा, काका भळगट, अमृत शेठ बेदमुथ्था, अशोक बोरा, लखिचंद बाफना, संतोष लोढा,विजय गुंदेचा,कांतीलाल बोथरा, संतोष गुंदेचा, सामाजिक कार्यकर्ते अभय शिंगवी, गौतम (दादा) बाफना, संतोष नवलाखा,मनीष जैन, अशोक बाफना, प्रवीण बाफना,संकेत कोठारी, अमित बोथरा, दिलीप नहार, डॉ. कटारिया डॉ. मेहेर, विनोद बोरा, जवाहर गुंदेचा,संजय कटारिया ,गणेश भळगट,संजय शिंगवी, रविंद्र, मनोज भंडारी, प्रविण गांधी, शितल सोळंकी आदी श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन बाफना, आशुतोष छाजेड,भूषण बोरा, संयोग पितळे, तुषार बोथरा, आनंद, बाफना,अमित पिपाडा, सोहम गुंदेचा, तेजस बोरा, मनोज लुंकड, निलेश पारख आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री बाफना यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मी गादिया यांनी मानले.
*पाठशाळेतील विद्यार्थ्यांचा महावीर जन्मकल्याणक दिनी सत्कार*
स्थानिक जैन पाठशाळेत महावीर जन्मकल्याणक दिनाचे औचित्य साधून विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, ज्यांनी सामायिक विधी, सहित पटिया, प्रतिक्रमण विधी, भक्तामर स्तोत्र, पूछीसुनम, तसेच श्री उत्तराध्ययन सूत्रातील तीन अध्याय यांसारखे धार्मिक ग्रंथ आणि विधी मनःपूर्वक कंठस्थ केले आहेत.ही विद्यार्थ्यांची साधना आणि मेहनत गौरविण्यासाठी आयोजकांनी हा स्तुत्य उपक्रम घेतला आहे.या धार्मिक शिक्षणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षिक भाग्यश्री बाफना, राखी गादिया,सोनल सुराणा,दर्शना चोरडिया,मंजू गांधी,आरती शिंगवी
,लक्ष्मी गादिया आदी.पाठशाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धर्माभिमान व आत्मिक प्रगल्भता वाढीस लागणार आहे, असे पालकवर्ग आणि समाजातील मान्यवरांनी नमूद केले.



