श्री दत्त संस्थान बालाघाट कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथे गुरू पौर्णिमा उत्सव व गुरू पूजन सोहळा
बीड / प्रतिनिधी:-श्रीक्षेत्र कपिलधार पासून जवळच असलेल्या
श्री.दत्त संस्थान बालाघाट कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथे प.पु.ष.ब्र.श्री 108 शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांच्या कृपाशीर्वादाने व दत्त उपासक वैजिनाथ महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बालाघाट डोंगर परिसरात श्री दत्त संस्थान कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथे गुरुवार दि. १० /०7/ २०२५ रोजी गुरु पौर्णिमा उत्सव व गुरू पूजन सोहळा आयोजित केला आहे.
तसेच संगीत भजनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या संगीत भजनामध्ये संगीत क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची हजेरी राहणार आहे. याबरोबरच गुरु पूजन सोहळा होणार आहे. यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे संस्थांनचे दत्त उपासक वैजिनाथ महाराज शिंदे यांनी कळवले आहे.
या गुरु पौर्णिमा उत्सवात अजब श्रीकृष्ण उद्धवराव यांची अन्नदान होणार आहे. तरी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.