राजकीय

उत्तेरप्रदेश विधानसभा निवडणूक | राज्यात सत्ता आल्यावर १० लाखांपर्यंतचा उपचार मोफत

 

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकी;या अवघे काही महिने शल्लेक राहिलेले असताना आता स्थानिक वातावरण चांगलेच टापू लागले आहे. तसेच भाजपने सुद्धा पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे.

प्रियंका गांधींनी आपल्या ट्विटरवरून माहिती दिली आहे की,कोरोना संसर्गात राज्यात पसरलेल्या तापेवरुन उत्तर प्रदेश सरकारचे राज्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आलं होतं. आरोग्य व्यवस्थाही पूर्णपणे जीर्ण झाली आहे. पण, आता स्वस्त आणि चांगल्या उपचारासाठी जाहीरनामा समितीच्या संमतीने, यूपी काँग्रेसने निर्णय घेतला आहे की, काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यावर कोणता १० लाखांपर्यंतचा उपचार मोफत देईल असं ट्विट त्यांनी केला आहे.

सध्या विविध मुद्दयावरून उत्तरप्रदेशातील योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना प्रियांका गांधी दिसून आल्या आहेत. त्यात शनिवारी बाराबंकी येथे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची आणि २० लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार केला तसेच शेतकऱ्यांचा गहू प्रति क्विंटल 2500 रुपयांना खरेदी केले जाईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या पिकाची किंमत 400 रुपये दराने मिळेल.

Back to top button