बीड

वढू बुद्रुक येथून आलेल्या धर्मवीर ज्वालेचे जामखेडमध्ये उत्साहात स्वागत

वढू बुद्रुक येथून आलेल्या धर्मवीर ज्वालेचे जामखेडमध्ये उत्साहात स्वागत

जामखेड: धर्मवीर बलिदान मासानिमित्त वढू बुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला जामखेड येथे आणण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जगदंब प्रतिष्ठान यांच्या वतीने या ज्वालेचे आयोजन करण्यात आले होते.

दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता वढू बुद्रुक येथून निघालेल्या धर्मवीर ज्वालेचे जामखेड शहरातील पंचायत समिती समोर “पुढारी वड” येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर,पोपट राळेभात,भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात, नगरसेवक अमित जाधव, प्रविण बोलभट आदी शिवप्रेमींनी भव्य स्वागत केले.
तसेच खर्डा चौक याठिकाणी विश्व हिंदु परिषदेचे विवेक कुलकर्णी, भाजप नेते संजय काशिद यांच्या हस्ते ” धर्मवीर ज्वालेचे’ पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी बबलू टेकाळे, अमोल निमोणकर, राजु भांबे, बजरंग दल संयोजक दिगंबर राळेभात,बाजार समितीचे संचालक सुरेश पवार, संजय डोके, संतोष गव्हाळे, अभिजीत राळेभात, सुरज पवार, ज्ञानेश्वर कुलथे, बाळासाहेब राऊत, अक्षय भोगे यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
ज्वालेच्या स्वागतानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतून,भव्य दर्शन यात्रा काढण्यात आली. ही यात्रा जय हिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, संविधान चौक मार्गे खंडोबा वस्ती येथील श्री शंभुसूर्य मर्दानी आखाडा येथे पोहोचली. येथे धर्मवीर ज्वालेचे विधीपूर्वक पूजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळला जातो. या काळात शिवभक्त विविध धार्मिक विधी करतात, तसेच काहीजण संकल्प घेऊन काही पदार्थ किंवा वस्तू वर्ज्य करतात. बलिदान मासाच्या शेवटच्या दिवशी मूक पदयात्रा काढली जाते.

Back to top button