ना. पंकजाताई मुंडे यांच्या निर्देशानुसार परळीत मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासाठी १२ व १३ एप्रिलला विशेष कॅम्प

ना. पंकजाताई मुंडे यांच्या निर्देशानुसार परळीत मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासाठी १२ व १३ एप्रिलला विशेष कॅम्प
*भाजपचे बुथ प्रमुख करणार प्रशासनाला सहकार्य ; मतदारांनी स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांची नावे अपडेट करावीत*
परळी वैजनाथ दि. १०—
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या निर्देशानुसार शहरात येत्या १२ व १३ एप्रिल रोजी मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. शहरातील भाजपचे सर्व बुथ प्रमुख प्रशासनाने नेमलेल्या बीएलओला यासाठी सहकार्य करणार असून प्रत्येक मतदारांनी स्वतःचे व कुटुंबातील सदस्यांचे नावाची तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) महाराष्ट्र राज्यात सुरुवात करण्याची घोषणा भारत निवडणूक आयोग करणार आहे. त्याअनुषंगाने दिनांक ३०.१०.२०२४ रोजी अस्तित्त्वात असलेली विधानसभा मतदार संघाची यादीवरुन सन २००५ च्या मतदार यादीमधील मतदारांची मॅपींग करणे, अस्पष्ट फोटो (BLUR PHOTO), मतदारांचे नवीन रंगीत फोटो गोळा करणे अदयावत करणे तसेच मयत, दुबार, स्थलांतरीत व डीएससी च्या नोटीसची पडताळणी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करणे आदी कामे विहित मुदतीत पार पाडण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
*सर्व बुथवर बीएलओ बसणार*
——–
परळी विधानसभा मतदार संघाअंतर्गत परळी तालुक्यातील २५८ मतदान केंद्र प्रस्तावित असून सदर मतदान केंद्रासाठी केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कामकाज पूर्ण करण्यारीता दिनांक १२ व १३ रोजी विशेष मतदार मॅपींग कॅम्प चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार सर्व मतदान केंद्रावर सकाळी १० ते सायं.५ या वेळेत सर्व बीएलओ मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहेत. तरी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर जावून आपापले मतदार मॅपींग, अस्पष्ट फोटो जमा करणे, व दुबार नावे, मयत व स्थलांतरीत नावे वगळणे इत्यादी कामे करून घ्यावीत. भाजपचे बुथ प्रमुख व पदाधिकारी प्रशासनाच्या मदत करणार असून मतदारांनी संबंधित बुथ प्रमुखांना अथवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करावा असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाने केले आहे.
••••


