राजकीय

आम्हाला कितीही त्रास दिला तरी त्यांना पुरून उरणार’

 

सध्या राज्यातील महाविकास आघाडी मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी तसेच त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला अवघे. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शीतयुद्ध सुरु झालेले पाहायला मिळत आहे. त्यातच आता याच मुद्दयावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.

केंद्र राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला वेगवेगळ्या एजन्सीचा वापर करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार सध्या सुडबुद्धीने वागत आहे, हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. केंद्राने कितीही त्रास देऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी महाविकासआघाडीचे सरकार 5 वर्ष पूर्ण करणारच आणि जे त्रास देत आहेत, त्यांना आम्ही पुरून उरणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

मागच्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकार बऱ्याच मुद्द्यावर एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. सध्या राज्यात गाजत असलेले आर्यन खान आणि समीर वानखेडेप्रकरणीही राज्यात मोठा गोंधळ दिसत आहे. ‘सध्या राज्यात मराठा, धनगर आणि अल्पसंख्याक समाजांची आरक्षणाची मागणी वाढत आहे. या समाजांच्या मागणीला राज्य सरकारमधील प्रत्येक पक्षाचा पाठींबा आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजप मुद्दामपणे राज्य सरकारला या मुद्द्यांवरून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपीचे त्यांनी लगावला होता.

Back to top button