📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मित्रत्व, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 

मित्रत्व, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
आमचे जिवलग मित्र दैनिक सूर्योदय चे उपसंपादक  श्री. श्रीकांत राजे जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यात कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, तरी त्यातून स्वतःला घडवत, संघर्षावर मात करत आणि आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीकांत राजे जाधव.
  पत्रकारिता असो किंवा सामाजिक क्षेत्र—प्रत्येकाला न्याय मिळावा, सर्वसामान्यांचा आवाज मांडला जावा आणि समाजात एकोपा टिकून राहावा, हा आपला कायम प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे.
आपला मार्ग स्पष्ट आहे—भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन चालणे.
या जीवनप्रवासात आपणास संपत्तीपेक्षा माणसांचे आशीर्वाद, प्रेम आणि पुण्याई कमावणे अधिक महत्त्वाचे वाटले. सर्वसामान्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या आणि त्यांच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे आवाज उठवत राहणे, हाच आपला आणि आपल्या विचारांचा कायम हेतू राहील.
काही माणसे काळानुसार बदलतात, काही नाती परिस्थितीनुसार बदलतात; परंतु माणुसकी, आदरभाव आणि सामाजिक बांधिलकी यांची मूल्ये बदलता कामा नयेत, असा आपला ठाम विश्वास आहे.
आणि म्हणूनच आज आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त एवढेच सांगावेसे वाटते की—
श्रीकांत राजे जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला घडवत अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. इतरांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करणे, माणसांना जोडणे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.
चुकीचा असेल तर मी चुकीचा आहे, हे स्वीकारण्याची नम्रता आणि योग्य वाटत असेल तर त्यासाठी ठामपणे उभे राहण्याचे धैर्य—हीच आपली  भूमिका आहे. सामाजिक एकोपा, परस्पर आदर आणि माणुसकी या विचारांवर आपला विश्वास आहे आणि तो कायम राहील.
प्रिय मित्र श्री. श्रीकांत राजे जाधव,
आपल्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य, यश आणि समृद्धी सदैव नांदो. आपल्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो आणि आपल्या कार्याला समाजाचा भरभरून आशीर्वाद मिळो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
 आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
माणसं जोडत राहा…
माणुसकी जपत राहा…
आणि समाजासाठी असेच कार्य करत राहा!
Back to top button