बीड
बीड रेल्वेसाठी गुन्हे अंगावर घेऊन निर्दोष सुटलेले बीड रेल्वेचे शिलेदार जिल्हा न्यायालया समोर…

बीड रेल्वेसाठी गुन्हे अंगावर घेऊन निर्दोष सुटलेले बीड रेल्वेचे शिलेदार जिल्हा न्यायालया समोर…
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा नंतर बीडकरांचे झुक झुक आगीनगाडीत (रेल्वे) चे स्वप्न साकार होत आहे.
मार्गास तांत्रिक मान्यता मिळवल्या नंतर खऱ्या अर्थाने या रेल्वे मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यासाठी मोठे जन आंदोलन झाले. यात अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.रल्तारोकोव दगडफेक प्रकरणात आंदोलक विरूद्ध महाराष्ट्र शासन अशा या प्रकरणात माजी आमदार सर्वश्री राजेंद्र जगतापसाहेब,भाई जनार्दन तात्या तुपे, सय्यद सलीम, सुशिलाताई मोराळे, अशोक हिंगे, संपादक सुनील क्षीरसागर,विजयकुमार बंब ,राजकुमार कदम, जोतिराम हुकुडे, संदीप उबाळे, बबनराव वडमारे, गणेश मस्के, करूणा टासाळ, नितीन रांजवण, गणेश उगले, संगमेश्वर आंधळकर,फारूक पटेल खुर्शीद आलम,परशुराम गुरखुदे आदींसह असंख्य कार्यकर्ते प्रदीर्घ न्यायालयीन लढाई नंतर सर्वांची निर्दोष मुक्तता झाली तेंव्हा जिल्हा न्यालयासमोरील फोटो…
पण त्या आंदोलनातले जेष्ठ नेते हनुमंतराव उपरे काका व तत्कालीन दोन विद्यार्थी नेते अमोल गलधर व ॲड बळवंत कदम आज आपल्यात नाहीत याचे दुःख आज या विजया प्रसंगी मनात आहे..



