पैशाच्या जोरावर नाही तर जनमतावर निवडणूक आम्ही जिंकू – संजय भोसले

पैशाच्या जोरावर नाही तर जनमतावर निवडणूक आम्ही जिंकू – संजय भोसले
प्रभाग क्रमांक ६ मध्ये संजय भोसले व प्रिती आहिरे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली; आमदार रोहित पवार यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ
जामखेड प्रतिनिधी: जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान प्रभाग क्रमांक ६ चे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार संजय भानुदास भोसले उर्फ काका तसेच नगरसेविका पदासाठी उमेदवार प्रिती राहुल आहिरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ हलगीच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.तसेच आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संत कान्होपात्रा देवी मंदिर व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना संजय भोसले म्हणाले की,पैशाच्या जोरावर नाही तर जनमतावर निवडणूक आम्ही जिंकू ,कारण प्रभागात अनेक प्रश्न आहेत,ते सोडवण्यासाठी सत्ता महत्वाची आहे.या साठी जनतेने आमदार रोहित (दादा) पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना निवडून देत सेवा करण्याची संधी द्यावी.जामखेड शहराच्या विकासासाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा विकास करण्यासाठी कार्यतत्पर राहील.
गेल्या ३० वर्षांपासून हेमंतकुमार धर्माजी घायतडक हे भारतीय जनता पार्टी च्या दलित सेल या पदावर काम करत होते.आज रोजी आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवर व नेतृत्वावर विश्वास टाकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यकर्त्यां सोबत जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ,शिवसेना उबाठा गटाचे (महाविकास आघाडी) चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांसह प्रभाग क्रमांक ६ येथील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.



