
श्रीमंतयोगी आश्रम शाळेत प्रवेशोत्सव साजरा.
बीड दि.१६( प्रतिनिधी): बीड शहरातील बहिरवाडी भागात असणाऱ्या श्रीमंतयोगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रम शाळेत सोमवार दिनांक 16 रोजी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या बाबत अधिक माहिती अशी की बीड शहरातील बहिरवाडी भागात असणाऱ्या श्रीमंतयोगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रम शाळेत सोमवार दिनांक 16 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये नव्याने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभाग बीड चे निरीक्षक लक्ष्मण बारगजे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते पाठ्यपुस्तके, सर्व शैक्षणिक साहित्य, खाऊ, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनोगतामध्ये लक्ष्मण बारगजे यांनी आश्रम शाळेमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या सुविधेसह दर्जेदार शिक्षण व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग नोंदवून नावीन्यपूर्ण कामगिरी आश्रम शाळेतील सर्व शिक्षक करत असल्याचे सांगितले. आश्रम शाळेतील विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी, राष्ट्रीय खेळाडू अशा विविध क्षेत्रात पोचलेले आहेत. शिवाय आश्रम शाळेतील विद्यार्थी हा आपलाच पाल्य समजून त्यांची वैयक्तिकरित्या काळजी घेण्याचा अनमोल सल्ला दिला. यावेळी श्री. प्रसाद शुक्ला, श्री. कोलंगडे सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. भडके एन. एम. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. धुमाळ एम. एम. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



