बीड

जामखेड येथे श्री सद्गुरू शांतिनाथ महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आयोजन

जामखेड येथे श्री सद्गुरू शांतिनाथ महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आयोजन

२५ मेपासून श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायणाचा शुभारंभ

जामखेड प्रतिनिधी:श्री सद्गुरू शांतिनाथ महाराज यांच्या ५३व्या पुण्यतिथी निमित्त जामखेड शहरातील नगर रोडवरील शांतिनाथ महाराज आश्रम मंदिर समितीच्या वतीने दिनांक २५ मे ते ३१ मे २०२५ दरम्यान भव्य श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत कथा आयोजित करण्यात आली असून, दररोज सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. कथेसाठी प्रसिद्ध कथाकार हभप गुरुकृपांकित दत्तात्रय (महाराज) हुके (मुमुक्षु पाठशाळा, पंढरपूर) आणि व्यासपीठ चालक हभप पंढरीनाथ राजगुरू (महाराज) हे उपस्थित राहणार आहेत. ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता शांतिनाथ महाराज आश्रम (नगर रोड) येथून विठ्ठल मंदिरापर्यंत पादुका मिरवणूक काढण्यात येणार आहे.

दिनांक १ जून २०२५ रोजी पुण्यतिथीनिमित्त होमहवन, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.मंदिर समितीने जामखेड शहरातील भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Back to top button