बीड

संस्कारच्या चिमुकल्यांनी घेतला रेल्वे प्रवासाचा आनंद. 

संस्कारच्या चिमुकल्यांनी घेतला रेल्वे प्रवासाचा आनंद.
बीड (प्रतिनिधी) येथील संस्कार विद्यालयातील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीच्या निमित्ताने बीड ते राजुरी  रेल्वेत बसण्याचा मनमुराद आनंद लुटला . यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह, आनंद मनाला प्रसन्न करून जाणारा होता. या   प्रवासादरम्यान मंगलमूर्ती मोरया, नारायणगड भगवान की जय, शालेय कविता, विविध गीत गायनातून बीडची  रल्वे भक्तिमय झाली होती. चिमुकल्यांच्या आवाजाने दणाणून गेली होती .दिनांक 13/ 2 /2026 रोजी ही क्षेत्रभेट संपन्न झाली .या क्षेत्रभेटीमध्ये  विद्यार्थ्यांनी  गणपतीचे दर्शन करून नवगण राजुरीचे धार्मिक महत्त्व समजावून घेतले. नारायणगडावर  पांडुरंगाचे दर्शन घेऊन अभंगावर नृत्य करुन स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
      ही सहल यशस्वी होण्यासाठी संस्कार प्रबोधिनीचे सर्व संचालक मंडळ, माननीय मुख्याध्यापिका शोभाताई कुलकर्णी, माननीय विभाग प्रमुख श्रीमती विद्याताई पारगांवकर यांचे मार्गदर्शन लाभले. सहल प्रमुख श्रीयुत जी. आर. कुलकर्णी व सर्व सहकारी शिक्षक  वृंदांनी विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घेऊन सहल यशस्वीरित्या संपन्न केली.
Back to top button