पिताजी सारडा नगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक बिनविरोध

पिताजी सारडा नगरी सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक बिनविरोध
अंबाजोगाई प्रति ;- प्रत्येकाला आपला विकास करणारा लोकप्रतिनिधी निवडण्याची महत्त्वाची संधी मतदानाच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेनं उपलब्ध करून दिली. लोकशाहीत एका मताची किंमत फार मोठी आहे. त्यामुळे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे.
जसे जेव्हा एक मताने पडले वाचपेय सरकार,एका मताने बदलली अमेरिकेची राष्ट्रभाषा,सि पी जोशी फक्त एका मताने हरले एवढे निवडणूकीत एका एका मताला महत्त्व आहे.
अंबाजोगाई शहरातील उच्चभ्रू नागरिकांची सोसायटी म्हणजे पिताजी सारडा नगरी या सोसायटीचे इलेक्शन लागले व निवडणूकीचे बिगुल वाजले आणि सोसायटी मध्ये कांहीं सदस्य बाशिंग बांधुन बसले. सदस्यांच्या मणामध्ये लड्डु फुटायला सुरुवात झाली.बेरजेचे गणित करायला सुरुवात झाली व आपले उमेदवारी दाखल करणे व चेअरमन व सचिवांच्या खुर्चीवर बसण्याची स्वप्ने पडु लागली. परंतु कांही सुज्ञ व जेस्ट नागरिकांनी विचार करुन वायफळ खर्चाला फाटा देत सोसायटी बिनविरोध काढायचे ठरवले व आगदी खेळीमेळीच्या वातावरणात दिनांक २१/०१/२०२५ ते २६/०१/२०२५ पर्यंत नवीन संचालक निवडण्याची प्रक्रिया झाली सुज्ञ नागरिकांनी सुचविल्या प्रमाणे निवडणूक समितीची स्थापना केली व त्यामध्ये कांही तरुण व कांही जेस्ट मंडळींची सर्वांनु मते निवड करण्यात आली. निवडणूक समिती व प्रत्येक विंग मधील नागरिकांनी खेळीमेळीच्या वातावरणात पुढचा विचार करून हुशार व तज्ञ संचालकाची बिनविरोध निवड केली. अपवाद तिन विंग मध्ये मतदान झाले व त्या मध्ये तिन्ही संचालक हे एक एक मताने निवडुन आले आता नागरीकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत कि आता सोसायटी चा कांही तरी विकास होईल असे कांही नागरिकांनी दैनिक सुर्योदय शी बोलताना भावना व्यक्त केल्या व जेष्ट संचालकांनी माघार घेऊन नवीन संचालकांन मधून तरुणांना काम करण्याची संधी निर्माण करून दिली व तरुणांच्या हातात कारभार दिला.ह्या तरुण मंडळीनी ह्या आगोदर पण संचालक नसताना सोसायटी चे हित पाहुन प्रत्यक्ष सोसायटी चे खुप चांगले कामे केले आहेत.
पिताजी सारडा नगरी सहकारी गृहनिर्माण संस्था म.जोगाईवाडी सन 2024 ते 2029 पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकती पार पडली व पुढील तज्ञ संचालकाची बिनविरोध निवड करण्यात आली
1)कुलकर्णी सचिन केशवराव सर्वसाधारण 2)शिंदे वैजनाथ दगडू सर्वसाधारण
3) गवळी ज्योती प्रल्हादराव सर्वसाधारण 4 )चव्हाण विनायक किसनराव सर्वसाधारण 5 )पाखरे वासुदेव ज्ञानोबा सर्वसाधारण
6) टेकाळे अनंत रमाकांत सर्वसाधारण
7)कांबळे राजेंद्र नागनाथ सर्वसाधारण
8) राख जयश्री शिवाजी सर्वसाधारण
9)शिराळे स्वप्नाली नितेश महिला राखीव
10)चाफेकर कविता बालाजी महिला राखीव
11)राख संतोष राजाभाऊभटक्या विजा/जमाती व विमाप्र
12)कटारे सचिन माधवराव ईतर मागासवर्गीय
13)रोडे सुनिल उत्तमराव अनुसूचित जाती जमाती
व त्या मधून अध्यक्षपदी श्री. संतोष रामभाऊ राख उपाध्यक्षपदी श्री. वैजेनाथ दगडू शिंदे, सचिवपदी श्री. सचिन केशवराव कुलकर्णी आणि कोषाध्यक्षपदी सौ.जयश्री शिवाजी राख यांची निवड करण्यात आली.नवीन अध्यक्ष/चेअरमन व सचिव यांनी दैनिक सुर्योदय शी बोलताना सांगितले कि भविष्यात आपली सोसायटी हि एक माँडेल बनवून .सोसायटी कशी असावी व सोसायटीच्या चेअरमन व संचालकाचे काय कामे असतात हे पहाण्यासाठी आपल्या सोसायटी त यावे लागेल.व आम्ही सर्व संचालक मंडळ मिळुन या सोसायटी चा चेहरा बदलु आशा भावना व्यक्त केल्या.
नवनियुक्त कार्यकारिणी २०२४-२९ पर्यंत कार्यरत राहणार आहे. सहाय्यक निबंधक एस.एस.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.वेडे जे.बी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
खरंच एवढ्या मोठ्या सोसायटी मधील रहिवाशांनी सदस्य, अध्यक्ष, सचिव व उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष यांना बिनविरोध निवडून देणे ही अतिशय आनंदाची बाब आहे. फार थोड्या सोसायट्यांमध्ये असा एकोपा पाहायला मिळतो. अशी बिनविरोध निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्याने प्रशासकीय कामकाज करणे सोयीचे होत असल्याची भावना निवडणूक निर्णय अधिकारीश्री .वेडे जे बी यांनी व्यक्त केली.
सर्व रहिवासी नागरिकांच्या वतीने निवडणूक समितीचे व नविन संचालकांचे अभिनंदन करीत आहेत व पुढील कामासाठी सर्व रहिवाशांनी शुभेच्छा दिल्या आहेत.



