नाटयशास्त्राच्या डिप्लोमा व प्रमाणपत्र परीक्षेत चि. अभिषेक इनकर व चि. अभिषेक घुले प्रथम

नाटयशास्त्राच्या डिप्लोमा व प्रमाणपत्र परीक्षेत चि. अभिषेक इनकर व चि. अभिषेक घुले प्रथम
बीड :- (प्रतिनिधी) : येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या नाटयशास्त्र विभागातील डिप्लोमा कोर्स मध्ये चि. अभिषेक इनकर व प्रमाणपत्र कोर्स मध्ये चि. अभिषेक घुले प्रथम आले आहे.
मार्च / एप्रिल 2026 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर च्या परिक्षेत नाट्यशास्त्र डिप्लोमा परीक्षेत चि. अभिषेक इनकर यास 72.42% मार्क मिळाले असून प्रमाणपत्र परिक्षेत चि. अभिषेक घुले यास 80% मार्क मिळाले आहे. मागील वर्षात या विद्यार्थ्यांनी “तीन पैशाचा तमाशा” या नाटकात भूमिका केल्या होत्या. शिवाय “आत कायं जळतंय”, “चेडा”,”भस्म्या” यासारख्या एकांकिकेत भूमिका करून अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल नवगण शिक्षण संस्थेच्या सहसचिव डॉ. दीपाताई क्षीरसागर, सचिव डॉ. योगेश क्षीरसागर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. विश्वंभर देशमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य तथा नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, प्रा. दुष्यंता रामटेक, प्रा. असलम शेख, प्रा. विजय राख आदिंनी अभिनंदन केले. आहे.



