बीड
१ते १५ डिसेंबर दरम्यान एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजन

१ते १५ डिसेंबर दरम्यान एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजन
भंडारा,: १ ते १५ डिसेंबर दरम्यान) जिल्हामध्ये विविध उपक्रम राबवून एचआयव्ही/एड्सविषयी युवक तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून तपासणीसाठी प्रोत्साहित करावयाचे असून जनजागृती करावयाची आहे. त्याअनुषंगाने जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण कक्ष (डापकू), जिल्हा रुग्णालय, भंडाराव्दारे ९ डिसेंबर 2025 ला सकाळी ९.३० वा. महाविदयालयीन विदयार्थी-विदयार्थीनीकरिता सायकल रॅली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
यावर्षीचे एड्स दिनाचे घोषवाक्य “Overcoming disruption, transforming the AIDS response” “अडथळ्यांवर मात करु, एकजुटीने एचआयव्ही/एड्सला लढा देऊ, नवं परिवर्तन घडवू “
सदर सायकल रॅलीस डॉ. सुजाता दुधगांवकर, अधिष्ठाता-शासकिय वैदयकिय महाविदयालय,डॉ. संदिपकुमार गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय,डॉ.अतुलकुमार टेभुर्णे-अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल अधिकारी (डापकू) जिल्हा रुग्णालय, भंडारा मान्यवरांव्दारे शपथ वाचन करून रॅलीस हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास हिरालाल निरगुळकर, एसएमओ, एआरटी, जि. रु, मनोज येरणे, प्र. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डापकू, जि. रु,वंदना शेंडे, मेट्रॉन, जिल्हा रुग्णालय,अनिल बनकर-जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, जि. प.डॉ. बांडेबुचे, डॉ. शेख-जि. रु, बेपारी आठवले समाजकार्य महा,सौ. तिडके प्राचार्या,कुरंजेकर प्राध्यापक. नूतन कन्या क. महा,शिवशंकर शेंडे- समन्वयक जिल्हा क्षयरोग केंद्र, महादेव बिसने प्रकल्प समन्वयक, सारथी कल्याणकारी संस्था, तसेच कार्यरत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या सायकल रॅलीस महाविदयालयीन अंदाजे २०० ते २५० विदयार्थी-विदयार्थीनी उपस्थित असून कुरंजेकर व प्राध्यापक. नूतन कन्या क. महा, शिवशंकर शेंडे- समन्वयक जिल्हा क्षयरोग केंद्र, महादेव बिसने-प्रकल्प समन्वयक, सारथी कल्याणकारी संस्था, तसेच कार्यरत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच सायकल रॅलीस महाविदयालयीन अंदाजे २०० ते २५० विदयार्थी-विदयार्थीनी उपस्थित असून सायकल रॅली दरम्यान वचन पाळा-एडस टाळा, एडस मुक्त महाराष्ट्र- स्वप्न नव्हे ध्येय, सतर्क रहा-सुरक्षित राहा, सुंदर लक्ष्मी असता घरी कशाला जाता एडसच्या दारी, शून्य गाठायचा आहे-Getting to Zero या घोषवाक्याच्या गजरात रॅली जिल्हा रुग्णालय मधून मोठा बाजार-गांधी चौक-पोलीस स्टेशन येथून नूतन कन्या कनिष्ठ महा, भंडारा येथे रॅलीची सांगता करण्यात आली. उपस्थित सर्व विदयार्थी विदयार्थीनी यांना मनोज येरणे, प्र. जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डापकू, जि. रु, भंडारा यांचेव्दारे मार्गदर्शन व शपथ वाचन करुन एचआयव्ही/एड्स यावर मार्गदर्शन करण्यात येवून विदयार्थीना अल्पोपहार देण्यात आले.
उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता ओमप्रकाश आकरे, विवेक पशिने, ज्योति श्रावणकर, कोमल पशिने, महेंद्र बंसोड, रामेश्वर राखडे, विनोद कुबडे, सुरेश ठाकरे, ओमप्रकाश पोटभरे, महेंद्र नाकाडे, कुंडलिक कडूकार, अर्चना बारई, नितु घाटबांधे, प्रेरणा थुल, निलीमा सेलुकर इत्यादी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



