बीड
घाटपिंपरी येथील भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न

घाटपिंपरी येथील भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
घाटपिंपरी (ता.वाशी) दि. 25 येथील बंडू तात्या क्रीडा मंडळ आयोजित भव्य खुल्या कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातून सुमारे 26 नामांकित संघ सहभागी झाले होते.
प्रथम पारितोषिक 21000 रुपये डॉ. लक्ष्मण सातपुते व मा. सुशीलकुमार पवार यांनी ठेवलेले पारितोषिक जय हनुमान क्रीडा मंडळ, महासांगवी या संघाने पटकाविले,द्वितीय पारितोषिक रुपये 15000 श्री पोपट सातपुते (फौजी) व भरत सातपुते (फौजी) यांनी ठेवलेले पारितोषिक महाराष्ट्र क्रीडा मंडळ, परांडा या संघाने मिळविले, तृतीय पारितोषिक रुपये 11000 श्री सतीश सातपुते (इंजिनियर) व महावीर सातपुते(युवा उद्योजक पुणे) यांनी ठेवलेले पारितोषिक स्वराज क्रीडा मंडळ भूम या संघास मिळाले, चतुर्थ पारितोषिक रुपये 7000 श्री बाळासाहेब मांगले (युवासेना जिल्हाप्रमुख धाराशिव) व चंद्रकांत सातपुते( मा.सरपंच घाटपिंपरी)यांनी ठेवलेले पारितोषिक अंबिका स्पोर्ट्स, बीड या संघास मिळाले, पाचवे पारितोषिक रुपये 5555श्री सुजित कैलास पाटील (ग्रामपंचायत सदस्य)यांनी ठेवलेले पारितोषिक बंडू तात्या क्रीडा मंडळ घाटपिंपरी या संघाने मिळविले तर सहावे पारितोषिक रुपये 3555श्री बालाजी सावकार (युवा उद्योजक) यांनी ठेवलेले पारितोषिक जय हनुमान क्रीडा मंडळ,महासांगवी या संघास मिळाले,बेस्ट रायडर रुपये 2100 श्री गणेश आप्पा लोखंडे यांनी ठेवलेले पारितोषिक सातपुते आयुष विष्णू यास मिळाले, मॅन ऑफ सिरीज चे रुपये 2100 श्री संतोष पाटील (उद्योजक) यांनी ठेवलेले पारितोषिक येडेश्वरी क्रीडा मंडळ, येरमाळा संघातील खेळाडूस मिळाले, शिस्तबद्ध संघाचे रुपये 2100 श्री निकम सर यांनी ठेवलेले पारितोषिक आदर्श क्रीडा मंडळ, ईट या संघास मिळाले तर बेस्ट डिफेंडर चे रुपये 2100 श्री धनराज पवार यांनी ठेवलेले पारितोषिक ज्योतिर्लिंग क्रीडा मंडळ, जोतिबाचीवाडी या संघास मिळाले. खेळाडूंना ट्रॅकसूट श्री किरण सुरवसे (ग्रामपंचायत सदस्य)यांनी दिले,विजय संघास ट्रॉफी श्री लक्ष्मण डिडवळ (सॉफ्टवेअर इंजिनियर) व श्री शरद पवार (मेकॅनिकल इंजिनियर)यांच्यातर्फे देण्यात आल्या, खेळाडूंची भोजन व्यवस्था श्री पोपट सातपुते (फौजी) यांनी केली होती प्रा. ब्रम्हनाथ मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक श्री शिवाजी आवारे, श्री तुकाराम सुरवसे,श्री निकम सर, श्री काकासाहेब पवार, श्री शंकर (बप्पा) आहिरे (पोलीस पाटील) श्री रामराजे सातपुते,श्री बालाजी गोडसे, श्री प्रमोद मांगले (फौजी) श्री सुशील निकम,श्री मनोज सातपुते, श्री बाबुराव मांगले,श्री सुधीर सातपुते इत्यादी यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.


