बीड
तालखेड जि.प.साठी दाट शक्यता : डॉ. श्रीराम खळगे पुन्हा लोकांच्या पसंतीस

तालखेड जि.प.साठी दाट शक्यता : डॉ. श्रीराम खळगे पुन्हा लोकांच्या पसंतीस
सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा माणूस डॉ. खळगे जिल्हा परिषदेत दमदार प्रवेशाच्या तयारीत
सुहास सावंत / माजलगाव :-तालखेड परिसरात विकासाचे नवे पर्व सुरू करणाऱ्या आणि लोकसंग्रहात नेहमीच आघाडीवर राहिलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले डॉ. श्रीराम विठ्ठलराव खळगे यांचे नाव पुन्हा एकदा तालखेड जिल्हा परिषद गटासाठी प्रबळ स्पर्धेत आहे. मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय सहभाग, सामाजिक प्रश्नांवरील भक्कम भूमिका व लोकांमध्ये सतत काम करण्याचा ध्यास यामुळे स्थानिकांसह कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष विश्वास निर्माण झाला आहे.डॉ. खळगे हे मागासवर्गीय सेल प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राज्यस्तरीय संघटनात्मक कामातही सक्रिय राहिले आहेत. तळागाळातील मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांवर ते एक प्रभावी आवाज म्हणून उभे राहिले. यामुळे संघटनात त्यांचे नेतृत्व अधिक दृढ झाले आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून त्यांना तालखेड गटासाठी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी केलेल्या कामांचा मजबूत पाया, सर्वसमावेशक विचारसरणी आणि सर्वसामान्यांत असलेली त्यांची लोकप्रियता पाहता आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
तालखेड गटात आरोग्य, शिक्षण, रस्ते, पिण्याचे पाणी व कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामे केल्याने जनतेत त्यांच्यावरील विश्वास आजही घट्ट आहे. गावागावातून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, युवकांतील आकर्षण आणि महिलांचा पाठिंबा हे त्यांचे महत्त्वाचे बळ ठरत आहे.स्थानिक नागरिकांचे म्हणणे स्पष्ट
“डॉ. खळगे यांनी केलेल्या कामामुळे आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या. विकासाचा वेग आणखी वाढावा म्हणूनच आम्ही पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत.”
आगामी काळात तालखेड गटातील राजकीय वातावरण आणखी रंगतदार होणार असून, डॉ. खळगे यांची उमेदवारी अधिकृत होण्याची प्रतीक्षा आता सर्वत्र सुरू झाली आहे. जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे त्यांची वाटचाल अधिक बळकट होत आहे.



