जगदंब प्रतिष्ठाणतर्फे रविवारी जामखेडमध्ये महाआरोग्य शिबिर

जगदंब प्रतिष्ठाणतर्फे रविवारी जामखेडमध्ये महाआरोग्य शिबिर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
जामखेड प्रतिनिधी : जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठाण,जामखेड आयोजित ,यांच्या वतीने रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती श्री.शिवाजी महाराज मेनपेठ येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जामखेड येथे हे शिबिर होणार आहे. शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश निमोणकर यांनी दिली.
शिबिरात सी.बी.सी.रक्तातील साखर (बी.एस.एल.),ए.सी.जी. ,एस.पी.ओ.२, रक्तदाब व नाडी तपासणी अशा विविध तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. तसेच हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, त्वचारोग, संधिवात, कंबरदुखी, पाठदुखी व अॅनिमिया आदी आजारांबाबत तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ. रोहन टोमके, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेखा पवार, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय राऊत, डॉ. विद्या काशिद, डॉ. अशोक पोते, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. अशोक बांगर यांच्यासह लॅब व केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी शिबिरासाठी सहकार्य करणार आहेत.
शिबिराच्या आयोजनामध्ये संजय (काका) काशिद, संस्थापक – (जगदंब प्रतिष्ठान),अध्यक्ष – भाजपा शहर मंडल, जामखेड यांचेही सहकार्य व सहभाग आहे.
आरोग्यदायी समाजासाठी एक पाऊल या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जगदंब प्रतिष्ठाण, जामखेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.



