बीड
बदल नवा कामाचा चेहरा हवा उच्च शिक्षीत तरुण निखिल मुंडे हक्काचा माणूस

बदल नवा कामाचा चेहरा हवा उच्च शिक्षीत तरुण निखिल मुंडे हक्काचा माणूस
बीड : प्रतिनिधी
भोगलवाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये आगामी जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री निखिल बद्रीनाथ मुंडे यांच्या पत्नी यांना उमेदवारी द्यावी, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये जोर धरत आहे.
निखिल मुंडे यांनी आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे तसेच त्यांच्या सुख दुःखात मदत करण्याचे कार्य केलेले आहे त्यामुळे इतर इच्छुक उमेदवारांपेक्षा निखिल मुंडे हे उच्चशिक्षित असल्याने व काम करण्याची आकांक्षा यामुळे तरुण तसेच सामान्य जनतेला अशी अपेक्षा आहे की त्यांनी भोगलवाडी गटातून निवडणूक लढवून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा
स्थानिक नागरिकांचा विश्वास आहे की, त्यांचा अनुभव, कुटुंबाचा सामाजिक व राजकीय पाठबळ आणि जनतेशी घट्ट नाते यांच्या बळावर त्या सदस्य पदासाठी योग्य उमेदवार ठरतील. सर्व गावकऱ्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा असून, सर्कलमध्ये त्यांचे अनेक काम चांगल्या प्रकारे पार पडल्यामुळे भोगलवाडीकरांच्या समोर फक्त त्यांचेच नाव येते आहे
नागरिक ठामपणे म्हणतात की, त्या पदासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी कार्य करणाऱ्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भोगलवाडी सर्कलमधील विकासकामे जलदगतीने साध्य होऊ शकतात.


