बीड

जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढणार : आकाश बाफना

जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढणार : आकाश बाफना

युवकांचा शिवसेनेत प्रवेश; जवळा येथे शाखेचे उद्घाटन

जामखेड प्रतिनिधी:
जामखेड तालुक्यातील जवळा येथे शिवसेनेच्या नव्या शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले तसेच उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बाबुशेठ टायरवाले यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले असून युवकांनी मोठ्या उत्साहात शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलताना शिवसेना युवा नेते आकाश बाफना म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जामखेड तालुक्यात घराघरात पोहोचवण्याचा निर्धार आहे. तसेच जिल्हा परिषद जवळा गटाचे नेते नितीन कोल्हे यांनी शाखा उभारणीसाठी मोठे प्रयत्न केले असून त्यामुळे संघटना अधिक मजबूत होत आहे. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करू, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ नेते कैलास जाधव, तालुका उपप्रमुख नितीन कोल्हे, युवासेना तालुका प्रमुख प्रविण बोलभट, बबन वाळुंजकर, दत्तात्रय दळवी, नवनाथ पचराने, शिवकुमार डोंगरे, अशोक कुमटकर, मोहन देवकाते, किरण मराळ, जवळा शाखा प्रमुख सुदर्शन मते, जवळा युवासेना प्रमुख सचिन बोराटे, नान्नज शाखा प्रमुख भिमा मोहळकर, नान्नज युवासेना प्रमुख छगन मोहळकर, भाऊ मोहळकर, संदीप मोहळकर, सुधीर काळे, विठ्ठल भुजबळ, आवा मलंगनेट, अनंत पवार, धनु मोहोळकर, गणेश गोटे, गणेश माकोडे, गणेश राजपूत, युवराज हजारे, दत्ता हजारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व जवळा-नान्नज परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उद्घाटन सोहळ्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीवर भर देत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जवळा व नान्नज गावांतील शाखा उद्घाटनामुळे परिसरातील राजकीय व सामाजिक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जनतेच्या समस्या थेट शाखेमार्फत मांडून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे.

——————————————–
पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढीलप्रमाणे:

शाखा क्र.१ जवळा:
शिवसेना शाखाप्रमुख : सुदर्शन हिरालाल मते
युवासेना शाखाप्रमुख : सचिन सोपान बोराटे
शिवसेना उपशाखाप्रमुख : मुकेश यमाजी आव्हाड
युवासेना उपशाखाप्रमुख : युवराज शिवाजी मेहर
इतर पदाधिकारी व शिवसैनिक : अजय वाळुंजकर, पांडू आगम, सुनील कथले, अजय पवार, अतुल हजारे, अतुल देवमाने, पांडू सरोदे, पोपट वाघमारे, कुलदीप पवार आदी
शाखा क्र.२ नान्नज:
शिवसेना शाखाप्रमुख : मोहळकर सावता भीमा
युवासेना शाखाप्रमुख : हरी छगन मोहळकर
शिवसेना उपशाखाप्रमुख : अमोल नवनाथ राऊत
युवासेना उपशाखाप्रमुख : संकेत श्रीमंत मोहळकर
शिवसेनेच्या या नव्या शाखा स्थापनेमुळे परिसरातील युवक व सामान्य नागरिकांमध्ये संघटनेच्या कार्यात सहभागी होण्याची ऊर्जा निर्माण झाली असून, जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढण्याची भूमिका जाहीर करण्यात आली आहे.

Back to top button