बीड

तलवाडा पोलिसांची मोठी कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त..

तलवाडा पोलिसांची मोठी कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त..
तलवाडा पोलिसांची धडक कारवाई; ३५ लाखांचा अवैध वाळूचा साठा जप्त
तलवाडा प्रतिनिधी
तलवाडा पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत विनापरवाना वाळूची चोरी करून वाहतूक करणारा हायवा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे ३५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.पोलीस ठाणे तलवाडा येथील अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर माजलगाव-गेवराई मार्गावरील नंदूर फाटा येथे सापळा रचण्यात आला. या दरम्यान संशयित हायवा अडवून तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना अवैध वाळू भरलेली आढळून आली.
या प्रकरणी हसनलाल लालीमिया कुरेशी (वय २९, रा. मालेगाव, ता. माजलगाव) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपी हा शासनाचा कर चुकवून वाळूची चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सदर कारवाईदरम्यान हायवा वाहनासह वाळू असा एकूण ३५,३५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कंवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांढरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर,पोलिस उपनिरीक्षक कैलास अन्लादास,पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी गोपनीय शाखेचे राठोड यांच्यासह पोलिस पथकाने केली.
Back to top button